Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६
Home
/
/
शिरपुरात गाडगे महाराज जयंती सोहळ्यासाठी उद्यानाची जागा समतल करा;नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी
शिरपुरात गाडगे महाराज जयंती सोहळ्यासाठी उद्यानाची जागा समतल करा;नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी
दै.तरुण गर्जना
शिरपूर: शहरातील श्रीनगर भागातील संत गाडगे महाराज उद्यानाची जागा तात्काळ समतल करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आगामी २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परिट समाजातर्फे हे निवेदन देण्यात आले आहे.
शिरपूर–शहादा रोडलगत असलेल्या श्रीनगर परिसरात एका ओपन स्पेस जागेत गाडगे महाराज उद्यान आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी गाडगे महाराज यांची १५० वी जयंती साजरी केली जाणार असून, त्यानिमित्ताने या उद्यानात कीर्तनाचे व आम्ही स्वच्छता दूत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक,नागरिक आणि धोबी समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मात्र, सद्यस्थितीत उद्यानाच्या जागेवर मोठे व खोल खड्डे पडले असून जमीन उंच-सखल आणि खडबडीत झाली आहे.अशा परिस्थितीत कार्यक्रमाच्या नियोजनात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उद्भवू शकतो.
या सोहळ्याचे महत्त्व आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन नगरपरिषदेने या ठिकाणी तातडीने मुरुम टाकून भराव करावा आणि जागा व्यवस्थित समतल करून द्यावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सदाशिव ठाकरे आणि नगरसेवक रोहित रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी शिरपूर तालुकाध्यक्ष भास्कर धोबी, शहराध्यक्ष नितीन जाधव,जिल्हा उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी,योगेश धोबी, छोटू धोबी, दिलीप ईशी,गोलू धोबी यांच्यासह धोबी समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा