Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
पालखेड बंधारा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केंद्रात अरुणोदय सिकलसेल विषयी जनजागृती
पालखेड बंधारा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केंद्रात अरुणोदय सिकलसेल विषयी जनजागृती
माधव खाबिया दिंडोरी प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात अरुणोदय सिकलसेल ऑनिमिया विशेष अभियान मोहीम विषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा गांगुर्डे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू (तात्या) चव्हाण जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार गोविंद ढेपले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच रेखा गांगुर्डे व पत्रकार बापू (तात्या) चव्हाण मुख्याध्यापक खैरनार, ढेपले यांचा आरोग्य विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आरोग्य सेवक वैद्यकार यांनी या अभियान मोहीम अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली.तसेच एमपी डब्ल्यू श्रीमती साबळे यांनीही गावातील उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन या आजाराबाबत माहिती व तपासणी करणार असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित महिलांना व विद्यार्थ्यांना या सिकलसेल याबाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण यांनीही सांगितले की आरोग्य विभागाच्या निदर्शनानुसार दि.१५ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबवण्यात येत असून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम प्रत्यक्ष घर भेटी देणार आहे तसेच संबंधित आजाराचे लक्षण असलेल्या रुग्णांनी तपासणी करून घ्यावी याशिवाय या आजाराची लक्षणे सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.एस. वैद्यकार यांनी केले तर आभार रंजना कडाळे यांनी मानले.
याप्रसंगी आरोग्य सेविका श्रीमती गांगुर्डे,आशा रंजना कडाळे,वैशाली बदादे,शितल गोतरणे,मुक्ता कोकाटे अशा गायकवाड,वर्षा वाघ,सुलताना सय्यद,अशा बनसोडे,कल्पना गायकवाड आदींसह ग्रामस्थ महिला, विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा