Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ जानेवारी, २०२६
अमळनेर तालुक्यातून तीन मुली बेपत्ता
दै.तरूण गर्जना रिपोट
अमळनेर : तालुक्यातील दहिवद, रुंधाटी व
शहरातील कृषी विकास कॉलनीतून तीन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. दहिवद येथील शिक्षण घेणारी १९ वर्षीय तरुणीचे आई वडील १६ रोजी शेतात कामाला गेले होते ते दुपारी अडीच वाजेला परत आले तेव्हा त्यांची मुलगी त्यांना घरात दिसून आली नाही. नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. त्याचप्रमाणे पिंपळे रस्त्यावरील कृषी विकास कॉलनीतील एक १९ वर्षीय तरुणी १७ रोजी सकाळी साडे सात वाजता धनदाई कॉलेज जवळून बेपत्ता झाली आहे. वडिलांच्या खबरीबरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत. तर तालुक्यातील मठगव्हाण येथून भडगाव तालुक्यातील आमडदे येथील ३४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. तिच्या भावाच्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा