Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ जानेवारी, २०२६
अखेर स्वखर्चाने शेतकऱ्यांकडूनच खड्डे बुजवण्याचे काम सुरू
संदीप अवधूत नाशिक ग्रामीण प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी ते मातेरेवाडी या शिवार रस्त्याची अतिशय दैयनीय अवस्था झाली असून येथील शेतकऱ्यांना पाई चालणे देखील कठीण झाले होते.हा रस्ता येथील शेतकऱ्यांना माल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे मात्र या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा संबंधित विभाग तसेच राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांना सांगितले. मात्र या रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.अखेर शेतकऱ्यांनीच स्वखर्चातून वर्गणी काढून या रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले.
यावेळी माजी सरपंच शांताराम वाघ,माजी उपसरपंच सुभाष अरगडे साहेबराव लोखंडे,सावळीराम वरपे, किशोर जाधव,दिनकर जाधव, कोंडाजी अरगडे,राजाराम अरगडे हिरामण जाधव,बाळू अरगडे,संजय जाधव,खंडेराव उगले,मनोरा अरगडे संतोष उगले,टकू उगले,बाळासाहेब पाटील,कैलास लोखंडे,पोपट उगले, आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा