Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
एटीएम चोरांना अटक; शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी राज्यभरातील एटीएम चोरीचा कट उधळला
एटीएम चोरांना अटक; शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी राज्यभरातील एटीएम चोरीचा कट उधळला
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात एटीएम मशीन चोरी करण्याचा डाव शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. संशयितांनी राज्यभर एटीएम चोरीचे जाळे उभारण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
अशी घडली घटना
दि. 17 जानेवारी रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयासमोरील शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या बँक ऑफ बडोदा एटीएमला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांच्या रात्रगस्त पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता संशयित पसार झाले होते.
त्यानंतर पित्रेश्वर कॉलनी स्टॉपजवळ संशयास्पद महिंद्रा पिकअप आढळून आली. पोलिस वाहन पाहताच संशयितांनी शहादा फाट्याच्या दिशेने पळ काढला. मुंबई–आग्रा महामार्गाने मध्यप्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिरपूर, थाळनेरसह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेसवरून नाकाबंदीचे आदेश देण्यात आले.
थरारक पाठलाग
हाडाखेड येथे संशयितांनी यू-टर्न घेत पुन्हा शिरपूरकडे येत बॅरिकेट्स उडवत दहिवद गावात प्रवेश केला. पुढे चोपडा रस्त्याकडे वळताना पोलिसांनी धाडसाने पाठलाग सुरूच ठेवला. संशयितांच्या वाहनातून रस्त्यावर ओढत नेलेला 15 ते 20 फूट लांबीचा साखळदंड पोलिसांच्या वाहनाखाली आल्याने चोरट्यांचा वेग मंदावला. पकड टाळता येणार नाही हे लक्षात येताच संशयितांनी धावत्या वाहनातून उडी घेतली. सुमारे 45 मिनिटांच्या पाठलागानंतर पिकअप वाहन शेतात अडकले व पोलिसांनी ते जप्त केले.
२४ तासांत आरोपी गजाआड
वाहनाच्या नंबरप्लेटवर चिखल लावण्यात आला होता. तांत्रिक तपासाअंती वाहन मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. विविध पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी संशयितांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे हेमंत सुकलाल माळी (वय 21, रा. भिरडई, ता. धुळे) व विदूर उर्फ विजय देवा जाधव (वय 40, रा. वसंत नगर, ता. पारोळा, जि. जळगाव) अशी आहेत.
यूट्यूबवरून प्रशिक्षण, राज्यात गुन्हे
चौकशीत संशयितांनी यूट्यूबवरून एटीएम चोरीचे व्हिडीओ पाहून प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. 9 जानेवारीला पिकअप वाहन खरेदी करून भंगार बाजारातून साखळदंड व साहित्य घेतले. धुळे येथील पंजाब नॅशनल बँक व अमळनेर येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम चोरीच्या गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग असून ते गुन्हे नोंद आहेत.
मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश
एटीएम चोरीपूर्वी शहरातील विविध एटीएमची रेकी, साईट मॅप तयार करून राज्यभर गुन्हेगारी नेटवर्क उभारण्याचा कट संशयितांनी रचल्याचेही समोर आले आहे. पुढील तपासात आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्यासह उपनिरीक्षक, हवालदार व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी बजावली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा