Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ जानेवारी, २०२६
उमराळे बुद्रुक येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ४३ रक्तदात्यांनी केले रक्तदान
माधव खाबिया दिंडोरी प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपा आशीर्वादाने व पेरणेने जीवनदान महाकुंभ रविवार दि.४ जानेवारी ते १८ जानेवारी २०२६ संपूर्ण भारतभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्याच धरतीवर दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील उमराळे बुद्रुक येथील श्री नागेश्वर व्यापारी संकुल येथे गरजू रुग्णांना उपचारासाठी तातडीने रक्त उपलब्ध व्हावे या दृष्टीने संस्थेमार्फत वर्षभर शिबिराचे आयोजन केले जाते त्यामुळे शनिवार दि.१७ जानेवारी रोजी नाशिक येथील अर्पण ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ४३ दानशूर रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रतिसाद दिला.
प्रथमतः सरपंच वसंत भोये प्रवीण केदार,वाळू धात्रक,रामदास धात्रक,संजय केदार,कैलास धात्रक यांच्या हस्ते दीप दीप प्रज्वलन आले.शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री नागेश्वर व्यापारी संकुलचे संचालक विष्णुपंत केदार अमोल खोडे,रंगनाथ पारधी,ज्ञानेश्वर पेलमहाले,राहुल थेटे,रितेश थेटे,भूपेश लोखंडे,अंकुश गामणे,भावेश थेटे, भारती लोखंडे,वृषाली थेटे,सुरेखा थेटे, आदींसह भक्तगण ग्रामस्थ महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा