Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ जानेवारी, २०२६
कॉलनी ते मोहाडी रस्त्याला मुहूर्त कधी? शेतकरी वाहनधारकांचा सवाल
माधव खाबिया- दिंडोरी प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड कॉलनी ते मोहाडी रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून रस्त्यामध्ये मोठ मोठी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी व वाहनधारकांनी या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? असा खोचक प्रश्न केला आहे.
पालखेड कॉलनी ते मोहाडी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो या रस्त्यावर सह्याद्री फार्म,ओझर बाजारपेठ, पिंपळगाव गाव बाजार पेठ,तसेच दिंडोरी बाजारपेठ,याशिवाय शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेस सह्याद्रीकडे जाणारे कामगार याच रस्त्याने ये जा करत असल्याने त्यामुळे वाहनधारकांची नेहमी वर्दळ या रस्त्याने सुरू असते वाहनधारकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यामध्ये मोठ मोठी खड्डे पडल्याने रात्री अपरात्री छोटे-मोठे अपघात देखील घडत असतात झालेल्या पावसामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही असा देखील प्रश्न नागरिक शेतकरी वाहनधारकांनी केला आहे.तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे त्वरित काम करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी वाहनधारकांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा