Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ जानेवारी, २०२६
भामट्यांना नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांनी कलिंगुट, गोवा येथुन केले जेरबंद
संदीप अवधूत- नाशिक ग्रामीण प्रतिनिधी
मु.पो.सांगवी ता.देवळा येथील तक्रारदार यांना व्हॉटसअप वर अनोळखी लिंक सेंड करून त्यांचे वर्चुअल डिमॅट अकांउट ओपन करून त्यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास त्यावर त्यांना १० पट कव्हरेज मिळुन अधिक नफा होईल. असे सांगुन अनोळखी मोबाईल नंबर वरून मारवाडी फायनान्स ब्रोकर यांचे वतीने शेअर मार्केट मध्ये कशा प्रकारे गुंतवणुक करायची आहे असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे डाउनलोड केलेल्या वर्चुअल ऍप्लीकेशन मध्ये वेळोवेळी त्यांनी अनेक बैंक खात्यात सुमारे ३२,०५,९००/- रूपये भरले. त्यांनी भरलेले पैशांची वेळोवेळी वाढ होत चालली होती असे नमुद वर्चुअल पोर्टल मध्ये एकुण ८३,३९,७००/- रूपये वाढ झाल्याचे दिसुन येत होते. जेव्हा त्यांना ही रक्कम काढावी असे वाटले तेव्हा त्यांना सायबर भामट्यांनी तुमच्या प्रॉफिट च्या रक्कमेवर २०% रक्कम तुम्ही इन्कम टॅक्स करीता आमच्याकडे जमा करा तेव्हा तुम्हाला ही रक्कम काढता येईल असे सांगितले. यामुळे तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी त्यांचे खाते असलेल्या एस बी आय बँकेत जावुन चौकशी केली असता समजले की आपल्या बरोबर फसवणुक झाली आहे. म्हणुन त्यांनी सायबर पोलीस स्टेशन येथे गुरनं १३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९ (२),३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक, आदित्य मिरखेलकर यांचे मागदर्शनाखाली नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पो.उप. निरीक्षक दिगंबर थोरात, पो. हवा. प्रमोद जाधव, पो.शि. सोहेल मुलाणी, पो.शि. राहुल भोर, मपोशि. दिक्षा मोरे, पो.हवा हेमंत गिलबिले, पो. हवा. प्रदिप बहिरम यांनी तांत्रिक तपास करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून १) उज्वल धर्मेंद्र बिरथरे रा. इमली रोड, मानपुर, तहसिल महु, जि. इंदोर २) अमन राजेंद्र शर्मा रा. इमली रोड. मानपुर, तहसिल महु, जि. इंदोर ३) चेतन दिलीप राठोड रा. १४/१० लोणीपुरा राव तहसिल राव, जि. इंदोर, रा. मध्य प्रदेश या आरोपीतांस कलिंगुट, गोवा येथून अटक केली आहे. तसेच यातील फिर्यादी यांचे १५,००,०००/- रूपये तक्रारदार यांना परत मिळुन देण्यात यश आले आहेत.
यातील अटक आरोपीतांनी तयार करण्यात आलेल्या बनावट लिंक ही पुढीलप्रमाणे १)
https://marwadifinacebroker.com/online-trading.html
htttps://marwadifinacebroker.com/call-and-trade.
अशा प्रकारे आहे तरी यापासून सावध राहावे असे आव्हान पोलिस अधिक्षक यांनी केले आहे.
नागरिकांना आवाहन
याव्दारे नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवुन आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देवु नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनव्दारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरीता संबंधीत बँकेच्या शाखेत जावुन खात्री करावी. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास क्लिक करू नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणुक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन तक्रारीकरीता १९३०, १९४५ यांना किंवा सायबर पोलीस स्टेशन कडील क्रमांक ०२५३-२२००४०८/७६६६३१२११२ यावर संपर्क करावा बाळासाहेब पाटील - पोलीस अधीक्षक भा. प्र. से
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा