Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
पालखेड कॉलनी परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत शेतकरी वटाणे यांच्या वासरावर बिबट्याचा हल्ला
पालखेड कॉलनी परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत शेतकरी वटाणे यांच्या वासरावर बिबट्याचा हल्ला
संदीप अवधूत नाशिक ग्रामीण प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा कॉलनी परिसरात शनिवार दि.१७ रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील शेतकरी वटाणे यांच्या घराजवळी गोठ्यातील वासरावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने येथील शेतकऱ्यांना व नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी या परिसरात वन खात्याने पिंजरा लावला होता त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले होते त्यानंतर या परिसरात सर्वत्र शांतता होती मात्र काल सायंकाळी कॉलनी परिसरात राहत असलेले शेतकरी पुंडलिक नामदेव वटाणे यांच्या घराजवळ असणाऱ्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईंच्या वासरावर पाठीमागे येऊन अचानक हल्ला करून बिबट्याने वासराचा गळा पकडला होता. त्यानंतर शेतकरी पुंडलिक वाटाणे यांच्या पत्नी हिराबाई वाटाणे यांनी या वासराचा आवाज ऐकताच स्वतःचा जीव धोक्यात घालून या बिबट्याला हातातील टोकर मारून फेकल्याने या बिबट्याने या वासराला सोडून दिले.त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे धाव घेऊन या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता परंतु नागरिकांचा आवाज ऐकताच हा बिबट्या पळून गेला.परंतु या वासराच्या गळ्याला बिबट्याचे दात लागल्याने ते जखमी झाले आहे.
तालुक्यामध्ये वन विभागाला काही ठिकाणी बिबटे पकडण्यात यश आहे येत आहे.याशिवाय वन विभागाकडून नागरिकांना शेतकऱ्यांना वारंवार बिबट्यांबाबत पशुपालन व आपले संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.परंतु या बिबट्यांची दिवसेंदिवस तालुक्यात संख्या वाढत असल्याने तालुकाच आता बिबट्यांचा बालेकिल्ला ठरू पाहत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने कर्मचारी व पिंजऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे. तरी वन विभागाने या परिसरात पिंजरा लावण्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा