Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

न्यायासाठी टोकाचे पाऊल? बाभळेतील आदिवासी कुटुंबाचा २५ जानेवारीपर्यंत प्रशासनाला अल्टिमेटम



शिंदखेडा प्रतिनिधी -शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील एका आदिवासीची शेत जमीन बनावट कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतजमीन हडप केली असून अनेक तक्रारी केल्या परंतू न्याय मिळत नसल्याने २६ जानेवारी (गणतंत्र) दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी कुटुंबांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे बाभळे,( ता.शिंदखेडा जि धुळे) येथील रहिवासी रामदास गंगाराम ठाकरे भिल यांनी जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात गंभीर आरोप करत २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
गट नंबर १५०/ १ व १५२ संदर्भात सन २०२३ ते २०२५ दरम्यान अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
विशेष म्हणजे, शिंदखेडा तहसीलदार यांनी दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेला सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होऊनही आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा गंभीर आरोप अर्जदाराने केला आहे.
या संदर्भात १८ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्मरण तक्रार देण्यात आली, तरीही प्रशासनाकडून दुर्लक्षच सुरू आहे.

या अन्यायकारक वागणुकीमुळे संपूर्ण कुटुंब मानसिक, आर्थिक व सामाजिक त्रास सहन करत असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे आदिवासी शेतकऱ्याने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे एका आदिवासी कुटुंबाचा जीव धोक्यात आला असून, जर काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
हा प्रकार लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध