Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

ना.गिरीश महाजन व आ. अमरीशभाई पटेल यांच्या सहकार्यातून बोराडीत जलक्रांती; ८० लाखांच्या निधीतून पाटचारीचे डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते लोकार्पण!...



डॉ. तुषार रंधे यांच्या पाठपुराव्याला यश; बोराडी परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी...
      
बोराडी: गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून पाठचारीतून शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. यासाठी ना. गिरीश महाजन व आ. अमरीशभाई पटेल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला. त्यानंतर वाटचारीचे काम पूर्णत्वास जाऊन आज त्या वाटचारीच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने बोराडी परिसर आता सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी व्यक्त केला.
        
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, उपविभागीय अधिकारी पी.बी.पाटील, शाखाधिकारी पुजा शिंदे, सहाय्यक कनिष्ठ अभियंता चेतन कर्वे,सरपंच सुखदेव मालचे, पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे,राज निकम, राजेंद्र पाटील, कालवा निरीक्षक दीपक सोनवणे कैलास कोळी धनराज शिरसाठ,भागवत पवार, रवींद्र शिंदे, हरी पावरा,पंडित पावरा, सुभाष गुजर, मनोहर महाजन, रामदास गुजर, पवार,भटू पाटील,जिवराम गुजर,भगवान बडगुजर, माधव पाटील, गोकुळ कुंभार, संजय पवार, निंबा पाटील, जिजाबराव पाटील, गणेश बुवा, हिम्मत पवार, शरद देसले ,गजू बडगुजर, सतिश पवार, शालिग्राम पाटील,वासु सत्तेसा, अविनाश सत्तेसा, मनोज सत्तेसा, गजू पाटील,अंबादास सगरे, लक्ष्मण गोपाळ, चंद्रकांत राजपूत, चंद्रकांत बडगुजर, प्रकाश वाल्हे, मुकेश जाधव, भुषण कुलकर्णी, उमेश पावरा,विजय पावर, यांच्यासह या सोहळ्याला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            
डॉ. तुषार रंधे पुढे म्हणाले की, या योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनात वाढ होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाण्याअभावी पडिक राहणारी शेती आता हिरवीगार होईल आणि परिसराच्या विकासाला नवे बळ मिळेल. या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले. 
        
मुख्यमंत्री समृद्ध योजनेअंतर्गत व माजी वसुंधरा अभियानांतर्गत बोराडी गावात विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात नवीन उपक्रम म्हणून गेल्या वीस पंचवीस वर्षापासून बंद पडलेल्या पाठचारीतून बोराडी परिसरात शेतीला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि शिरपूरचे लोकनेते आ. अमरीशभाई पटेल यांच्या विशेष सहकार्यातून ऐंशी लाख रुपये मंजूर झालेल्या निधीतून नूतन पाटचारीचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व राहुल रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
         
शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त

या पाटचारीमुळे बोराडी परिसरातील शेकडो एकर जमिनीचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून, ऐन उन्हाळ्यात पिकांना संजीवनी मिळणार आहे. राहुल रंधे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले आहे. याबद्दल पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


नेत्यांच्या पाठबळामुळे निधीचा मार्ग मोकळा... राहुल रंधे...
       
शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असलेल्या डॉ. तुषार रंधे यांनी या पाटचारीच्या कामासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना ना. गिरीश महाजन आणि आ. अमरीशभाई पटेल यांनी मोलाची साथ दिली, ज्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर झाला. "बापूसाहेबांच्या शब्दाला मान देऊन आणि नामदार महाजन साहेब तसेच भाईंच्या मार्गदर्शनामुळे आज हे काम पूर्णत्वास आले आहे. या नवीन जलवाहिनीमुळे आता शेतकऱ्यांच्या शिवारात हक्काचे पाणी खळखळणार असल्याचे"उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी सांगितले.
        
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी पी.बी.पाटील, यांनी सांगितले की, जुन्या पाठचारीला दुरुस्ती करण्यासाठी शासनाचा निधी उपलब्ध नसतो पण डॉ. तुषार रंधे व सरपंच राहुल रंधे यांच्या प्रयत्नातून या पाठचारीला निधी उपलब्ध करून काम पूर्ण होऊन आज शेतीपर्यंत पाणी आले आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन राज निकम यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध