Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६
कादवा म्हाळुंगी येथे पाणी सुरक्षा नियोजनाचे प्रशिक्षण संपन्न*
कादवा म्हाळुंगी- ग्रामपंचायत येथील अंगणवाडी येथे पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन व इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन मार्फत पाणी सुरक्षा नियोजनाचे प्रशिक्षण व पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन व चाइल्ड सर्वायवल इंडिया फाउंडेशन मार्फत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले.
यात प्रथम पाणी सुरक्षा नियोजनाबाबत पाण्याचे महत्व जलसुरक्षा योजना (WSP)म्हणजे काय?जलसुरक्षा योजना स्त्रोतांपासून घरापर्यंत सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यांनी सुचवलेली पद्धत आहे उपाय करण्याऐवजी संभाव्य धोक्यांची ओळख करून सुरुवातीपासूनच प्रतिबंध करण्यावर यावर यात भर दिला जातो ग्रामीण भागात ही योजना पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तसेच आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीची पाणी व्यवस्थापन क्षमता मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि योजनेमुळे पाणीपुरवठ्यातील धोके वेळेवर ओळखता येतात जलसुरक्षा योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये असलेले धोके ओळखता येतात पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी कृती आराखडा तयार करता येतो.
ग्राम पंचायत ग्रामचल व स्वच्छता समिती यांना प्रशिक्षण देता येते तसेच स्वच्छता पाणी हाताळणी आणि वापर याबाबत जागरूकता वाढवता येते तसेच त्यामुळे गावात होणारी फायदे स्वच्छ पिण्याचे पाणी अतिसार, कॉलरा,टायफाईड,यांसारखे रोग कमी होतात तसेच आरोग्य सुधारणा विशेषतः महिलांचे व मुलांचे आरोग्य चांगले राहणे. पाणीपुरवठा टिकाऊ होणे नियमित- तपासणी देखभाल यामुळे पायाभूत सुविधा टिकून राहतात शासन व्यवस्था मजबूत होते ग्रामपंचायती (VWSC) अधिक प्रभावी होते तसेच गावाचा व गावातील पाणी स्रोतांचा व संसाधनांचा सॅटॅलाइट नकाशाच्या द्वारे गावातील पाण्याच्या स्रोतांचा व गावातील माहितीचा आढावा घेण्यात आला तसेच एका कार्ड खेळाद्वारे गावातील पाण्याबाबत चे संभाव्य धोके स्रोत शुद्धीकरण वितरण आणि साठवणूक व वापर करता या मुद्द्यांच्या आधारे जाणून घेतले तसेच या प्रशिक्षणाच्या वेळी प्रशिक्षणाच्या अगोदरची व नंतरचे जलसुरक्षा नियोजनाची प्रश्नावली उपस्थित ग्रामस्थांकडून भरून घेण्यात आली.जल सुरक्षा नियोजनाच्या प्रशिक्षणा सोबतच पाणी नमुने तपासणी व गावातील जल सुरक्षा नियोजन च्या प्रशिक्षण ची पाणी सुरक्षा समिती व वाॅटर चॅम्पियन यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन या संकल्पनेवर मुख्यत्वे करून कार्य केले जाते.या प्रशिक्षणातून कादवा महाळुंगी या गावातील पाणी सुरक्षा नियोजन संदर्भातली सखोल माहिती मिळाली या प्रशिक्षणाला व हिमोग्लोबिन शिबिराला गावातील ग्रामस्थांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी ईकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशनच्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर, प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी,टेक्निकल टीम चे साजन गुळवे तसेच त्यांचा फिल्ड स्टाफ, ग्रामपंचायत अधिकारी जाधव सर अंगणवाडी मदतनीस मंगल लांडे, अंगणवाडी आशा सेविका पूजा चौरे, आरोग्य सेविका जोसना तोरडे, चाइल्ड सर्वायवल इंडियाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अमोल येवला, फार्मसीस पवन सोनवणे,हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण आदीसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा