Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

तीन वर्षांच्या चिमुकलीवर अनैतिक कृत्य; शिरपूर एसटी महामंडळातील निलंबित कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल



शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर अनैतिक कृत्य केल्याप्रकरणी शिरपूर एसटी आगारात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या देसाई नावाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला एकांतात बोलावून तिच्यावर अनैतिक कृत्य केल्याचा आरोप आहे. हा प्रकार मुलीच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध POCSO कायदा तसेच भारतीय दंड विधान संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी धुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिरपूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आरोपीला पोलिसांनी अमळनेर येथून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू असून, घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात आहे. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भात कायद्यानुसार आरोपी दोषी आढळल्यास कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे. दरम्यान, पीडित मुलीची ओळख गुप्त ठेवणे कायद्याने बंधनकारक असल्याने तिची कोणतीही वैयक्तिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध