Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

भोई समाजाचा अभिमान! झोडगेच्या सचिन मोरेची तीन संरक्षण दलांत घवघवीत निवड



झोडगे (ता.मालेगाव, जि. नाशिक) प्रतिनिधी
झोडगे येथील भोई समाजातील श्री. वामन शामराव मोरे यांचे सुपुत्र कुमार सचिन वामन मोरे यांनी एकाच वेळी भारतीय संरक्षण दलाच्या तीनही दलांमध्ये निवड होण्याचा मान मिळवून झोडगे व माळमाथा परिसराचा मान अभिमानाने उंचावला आहे. या ऐतिहासिक यशामुळे सचिन हे झोडगे परिसरातील पहिले कॅडेट ठरले असून, त्यांनी अखेर केंद्रीय राखीव पोलीस दल (सी.आर.पी.एफ.) मध्ये सेवा करण्याची पसंती दर्शवली आहे.

अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सचिनने कोणतेही विशेष पाठबळ नसताना केवळ अभ्यास, कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादासह स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी हे यश मिळविल्याने संपूर्ण भोई समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशामुळे समाजाचा नावलौकिक वाढला असून सर्व स्तरांतून सचिनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल झोडगे येथील भोई समाजाच्या वतीने सचिनचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार जेष्ठ समाजसेवक सिताराम मोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विकास खेडकर (भोई समाज युवा मंच, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष) यांच्यासह ताराचंद मोरे, शिवराम मोरे, रघुनाथ मोरे, गौतम मोरे, सुनील मोरे, सोनू मोरे तसेच भोई समाज युवा मंच नाशिकचे कार्याध्यक्ष व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन मोरे यांच्या या यशाबद्दल सर्व उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. देशसेवेसाठी सज्ज होत असलेल्या या भूमिपुत्राच्या कार्यामुळे झोडगे गावाचे नाव राज्यात व देशात उज्वल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध