Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
पिंपळनेर हादरले! पिंपळनेरमध्ये लग्नमंडपात रक्ताचा सडा; नवरदेवाकडील लोकांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
पिंपळनेर हादरले! पिंपळनेरमध्ये लग्नमंडपात रक्ताचा सडा; नवरदेवाकडील लोकांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
पिंपळनेर प्रतिनिधी:- पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.. या घटनेत सोनू गोसावी देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून, साई गोसावी यांचा धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे... याप्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे गोसावी समाजात एका विवाह सोहळ्यात भाऊबंदांमध्ये वाद होऊन मंडपात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली या घटनेत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत
या घटनेतील आरोपी गुजरातला ब्रेझा कार मधून पळून जात असताना पिंपळनेर पोलिसांनी त्यांना ओटाबरी या गुजरात बॉर्डर घाटात तेथील रहिवाशांना गाडीचा नंबर देऊन ट्रॅफिक जाम करण्यास सांगितले, या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून हे तिन्ही आरोपी गुजरात राज्यातील सोनगड येथील रहिवासी असून याप्रकरणी कांतीलाल गोसावी वय वर्ष 42 आणि जसवंत गोसावी वय वर्षे 36 आणि वाहन चालक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे...
या घटनेत सुरेश गोसावी साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार या तिघांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पिंपळनेर प्रतिनिधी:- पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली या वादातून धारदार ...
-
चोपडा प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच कायद्याची उघड थट्टा केल्याची अत्यंत धक्कादा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा