Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६
Home
/
/
हाडाखेड चेकपोस्टवर शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई; २३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा तस्करास अटक
हाडाखेड चेकपोस्टवर शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई; २३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा तस्करास अटक
शिरपूर (प्रतिनिधी):
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याची तस्करी करणारी एक लक्झरी बस शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांनी हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर पकडली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी बससह एकूण २३ लाख १९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एका लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हाडाखेड नाक्यावर पोलिसांनी सापळा रचला. संशयित लक्झरी बस (क्रमांक MP 44 ZD 3758) अडवून तिची झडती घेतली असता, त्यात रजनीगंधा, तुलसी, तानसेन, सिग्नेचर, मीराजी आणि गणेश छाप तंबाखूचा मोठा साठा आढळला.
जप्त केलेला मुद्देमाल:
लक्झरी बस: अंदाजे २० लाख रुपये किंमत.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखू: ३ लाख १९ हजार ५१० रुपये.
एकूण मुद्देमाल: २३ लाख १९ हजार ५१० रुपये.
आरोपीवर कारवाई:
या प्रकरणी बस चालक महेंद्र आनाराम चौधरी (वय ३४, रा.मुनदियार, जि.नागोर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक:
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि जयपाल हिरे, पोउनि मनोज कचरे, सुनील वसावे, किशोर चव्हाण, संतोष पाटील, योगेश मोरे, संजय ठाकरे, स्वप्नील बांगर, विजय ढिवरे, अनिल चौधरी, राजू ढिसले, मुकेश पावरा, रोहिदास पावरा, रणजित देशमुख आणि भूषण पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा