Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६
Home
/
/
जळगाव पोलीस दलात खळबळ: दक्षता पेट्रोल पंपावर सव्वा कोटींचा अपहार; व्यवस्थापक पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगाव पोलीस दलात खळबळ: दक्षता पेट्रोल पंपावर सव्वा कोटींचा अपहार; व्यवस्थापक पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या 'दक्षता' पेट्रोल पंपावर तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा मोठा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर या पंपाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती, त्या पोलीस उपनिरीक्षकानेच हा डल्ला मारल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संशयित पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासणीत वाल्मीक वाघ यांनी पेट्रोल पंपाच्या व्यवहारातील कोट्यवधींची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप उत्तमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपहाराचा हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर कारवाईच्या भीतीपोटी वाल्मीक वाघ हे एक चिठ्ठी लिहून गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याबाबत स्वतंत्रपणे बेपत्ता असल्याची नोंदही करण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या उत्पन्नाचा स्रोत आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेला हा पेट्रोल पंप सध्या या अपहारामुळे बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पोलीस दलातीलच एका जबाबदार अधिकाऱ्याने अशा प्रकारे कोट्यवधींचा अपहार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि पोलीस कल्याणासाठी चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच कायद्याची उघड थट्टा केल्याची अत्यंत धक्कादा...
-
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर अनैतिक कृत्य केल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा