Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६
डोळ्यात मिरची फेकुन व्यापाऱ्याचे साडेपाच लाख रुपये लांबवले
अमळनेर प्रतिनिधी : स्कुटीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याकडील साडे पाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २५ रोजी सकाळी पिंपळे रस्त्यावर घडली.
बाजार समितीतील व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात असताना तीन अज्ञात इसम मोटरसायकलवर आले. तिघांच्या तोंडाला मास्क बांधलेले होते. त्यांनी प्रथम कोठारी यांचा चष्मा काढून खाली फेकला व त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. याच क्षणी कोठारी यांच्याकडील साडे पाच लाख रुपयांची पिशवी खाली पडली. ती पिशवी उचलून तिन्ही चोरटे मोटरसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेची माहिती व्यापाऱ्याने तात्काळ पोलिसांना तोंडी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे.
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा