Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
नरडाणा पोलिसांची मोठी कारवाई: महावितरणच्या तारा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नरडाणा पोलिसांची मोठी कारवाई: महावितरणच्या तारा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नरडाणा प्रतिनिधी:- वीज खांबावरील ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या राजस्थानमधील एका आंतरराज्य टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या तारा, आयशर वाहन आणि इतर साहित्यासह एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २० जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान, नरडाणा १३२ के.व्ही. सबस्टेशन समोरील खांबावरून नरडाणा-मेळाणे रोड दरम्यानच्या ४२ गाळ्यांमधील ॲल्युमिनियम कंडक्टर (तारा) चोरीला गेल्या होत्या. सुमारे ४ लाख रुपये किमतीच्या या तारांची चोरी झाल्याप्रकारणी 'रामा फॉस्फेट लि. कंपनी'चे फिर्यादी आदित्य किशोर पोतदार यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा (रजि. नं. १२/२०२६) दाखल करण्यात आला होता.
असा लागला छडा
पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) नारायणसिंग राजूसिंग वय ३८, २) लोकेश बन्सीसिंग रावत वय २२, ३) हिरासिंग धनासिंग रावत वय २८, ४) प्रकाशसिंग लालसिंग रावत वय २८, ५) भवानीसिंग लालसिंग रावत वय ३०, ६) राधेश्याम गणेशसिंग रावत (सर्व रा. जि. भिलवाडा, राजस्थान).
गुजरातमध्ये केली होती विक्री
तपासादरम्यान समोर आले की, आरोपींनी चोरीचा माल गुजरात राज्यातील वडोदरा येथील हितेनसिंह उर्फ इकतेश्वर नरेंद्रसिंह आणि त्यानंतर अमरेली येथील सुमरा निसार अहमद उस्मानभाई यांना विकला होता. पोलिसांनी या साखळीचा तपास करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
वीज वाहक तारा: ३,७५,००० रुपये (०५ बंडल)
आयशर वाहन (RJ 06 GC 7265): १०,००,००० रुपये
मोबाईल फोन: ३०,००,००० रुपये (०४ नग)
इतर साहित्य: १०,००० रुपये (कटर, लोखंडी पक्कड, तराजू इ.)
एकूण किंमत: १४,१५,००० रुपये.
तपास पथक
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पिंपळनेर प्रतिनिधी:- पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली या वादातून धारदार ...
-
अमळनेर: - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी हप्ता ३ ते ५ दिवसांत जमा होणार राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा