Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६
पाडळसे या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव द्या
आमदार अनिल पाटील यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीना विनंती पत्र
अमळनेर प्रतिनिधी:- निम्न तापी प्रकल्प पाडळसे ता. अमळनेर या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे याबाबतचे विनंती पत्र माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्रीना दिले आहे.
सदर पत्रात म्हटले आहे की निम्न तापी प्रकल्प पाडळसे, हा तापी नदीवरील अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच धुळे जिल्हयातील शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
तसेच १७.१ टी.एम.सी. पाणी अडविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाने शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सुध्दा पाणी राखीव असल्याचे नियोजन आहे. एवढा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्याने मंत्रीमंडळ बैठकीत डिसेंबर, २०२४ मध्ये ४ हजार ८९० कोटी रुपये एवढी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली.त्यानंतर शासनाने प्रकल्प केंद्रीय जलआयोग, (cwc) यांच्याकडे प्रकल्प मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर प्रकल्प केंद्रीय जलआयोग, (cwc) ने इतर संबंधित विभागाच्या वैधानिक मान्यता प्राप्त झाल्या त्यात महत्वाचे म्हणजे राज्याचा हिस्सा देण्याची हमी अजितदादा पवार यांच्या मार्फत राज्य वित्त आयोग (SFC) यांनी दिल्यानंतर cwc ने शिफारस करुन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे प्रकल्प पाठविण्यात आला.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विशेष अधिकार समितीची मान्यता घेऊन प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना (PMKSY) या योजनेत समाविष्ट करण्यात आला. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे जलपुजन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते. परंतु त्यांच्या पाठपुराव्याने हा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. आज दुर्देवाने ते आपल्यात नसल्याने या प्रकल्पाला अजितदादा पवार निम्न तापी प्रकल्प पाडळसे, ता. अमळनेर, जि. जळगाव असे नावास मान्यता दयावी, अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पिंपळनेर प्रतिनिधी:- पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली या वादातून धारदार ...
-
अमळनेर: - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी हप्ता ३ ते ५ दिवसांत जमा होणार राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा