Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
१ कोटींच्या हायवा डंपर चोरीचा पर्दाफाश शिरपूर पोलिसांची आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई; राजस्थान-हरियाण्यातून ४ आरोपी अटक
१ कोटींच्या हायवा डंपर चोरीचा पर्दाफाश शिरपूर पोलिसांची आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई; राजस्थान-हरियाण्यातून ४ आरोपी अटक
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने ०१ कोटी रुपयांच्या हायवा डंपर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश केला असून राजस्थान व हरियाणा येथून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीने शिरपूर शहरातून दोन हायवा डंपर चोरल्याचे उघड झाले आहे.
दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी शिरपूर शहरातील टाकरदार प्रवीण लक्ष्मण चौधरी (रा. प्लॉट नं. ३३, मिलानगर, शिरपूर) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी टाटा कंपनीचे सिग्ना मॉडेलचे पांढऱ्या रंगाचे दोन मालवाहू हायवा डंपर (MH-18 BZ 5114 व MH-18 BH 1718) चोरट्यांनी पळवून नेल्याची माहिती दिली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक तयार करण्यात आले. पथकात पो.हवा. रविंद्र आव्हाडमल, पो.कॉ. गोविंद कोळी, पो.कॉ. विनोद आव्हाडमल, पो.कॉ. आरिफ तडवी, पो.कॉ. प्रशांत पवार, पो.कॉ. भूद साळुंके यांचा समावेश होता. पोलिसांनी शिरपूर ते मध्यप्रदेश, राजस्थान व हरियाणा राज्यात सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात राजस्थान राज्यातील भिलवाडा परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून खालील आरोपींना अटक केली —
इसराफान उस्मान मेव (वय ४०) – रा. बडका, ता. नूंह, राज्य हरियाणा
नियामत दिन मेव (वय ३४) – रा. हातीन, जिल्हा पलवल, राज्य हरियाणा
कालू गुरखुडा मेव (वय ५०) – रा. मुकाम भिलवाडा, राजस्थान
महावीर प्रसाद भंवरलाल शर्मा (वय ५०) – रा. पानसेल, भिलवाडा, राजस्थान
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेले दोन हायवा डंपर हस्तगत केले. तसेच चोरीसाठी वापरलेली बलेनो कार (HR-52-G-7875) देखील जप्त करण्यात आली आहे.
जप्त मुद्देमालाचा तपशील :
टाटा सिग्ना 2380 हायवा डंपर – किंमत ₹47,00,000/-
टाटा सिग्ना 3532 हायवा डंपर – किंमत ₹53,00,000/-
बलेनो कार – किंमत ₹10,00,000/-
एकूण जप्त मुद्देमाल : ₹1,10,00,000/- (एक कोटी दहा लाख रुपये)
सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्र आव्हाडमल करीत आहेत.शिरपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहनचोर टोळीचा मोठा पर्दाफाश झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा