Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
ड्युटीवर असताना पोलिसांचीच हाणामारी! चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री कायद्याची उघड थट्टा
ड्युटीवर असताना पोलिसांचीच हाणामारी! चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री कायद्याची उघड थट्टा
चोपडा प्रतिनिधी :-चोपडा तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच कायद्याची पायमल्ली केल्याचा धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री 11 ते 12 वाजेदरम्यान दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये थेट हाणामारी झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
रात्रीच्या अंधारात चोपडा हद्दीत त्या अवैध धंद्यातून “आपला फायदा कसा करून घ्यायचा” या वादातूनच पोलिसांमध्येच संघर्ष पेटल्याची गंभीर चर्चा परिसरात रंगली आहे. कायद्याचे रक्षकच जर गुन्हेगारांप्रमाणे वागू लागले असतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कुणाकडे पाहायचे, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
जनतेच्या पैशावर वेतन घेणारे पोलिस कर्मचारी गुन्हेगारी व्यवहारातून हिस्सा मिळवण्यासाठी एकमेकांवर हात उगारत असतील, तर ही केवळ हाणामारी नसून संपूर्ण पोलीस यंत्रणेवर डाग लावणारी घटना आहे. या प्रकरणामुळे चोपडा तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून “गुन्हेगारांवर कारवाई कधी होणार, की पोलीसच गुन्हेगार झालेत?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
या गंभीर घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोन्ही पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच चोपडा परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश करून त्यामागील संपूर्ण साखळी उघडी पाडावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
ड्युटीवर हाणामारी, अवैध धंद्यातून फायदा, आणि कायद्याची थट्टा – हे चित्र जर खरे असेल, तर चोपडा पोलीस स्टेशनमध्ये कायदा नाही, तर अराजकता नांदते आहे, असेच म्हणावे लागेल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...
-
बापूसाहेब वाडीले, पारोळा व्हाटसअप नं. 9503559333 पारोळा प्रतिनिधी : पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तालुक्यातील पिंपरी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा