Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी 🏹



मुडी प्र. अमळनेर (ता. अमळनेर) – महाशिवरात्रीच्या पवित्र निमित्ताने मुडी दरेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच मा. रमेश सोनवणे व एकलव्य मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
या जयंतीनिमित्त सायंकाळी भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर “जय एकलव्य”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमास मारवाड पोलीस स्टेशनचे API मा. जी भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मा. विकास दादा सोनवणे, गुलाब भाऊ बोरसे, मोतीलाल भाऊ सोनावणे, महेंद्र भाऊ पवार, सुनील भाऊ सोनवणे, रवी भाऊ मालचे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी भगवान एकलव्य यांच्या गेटअपमध्ये अजय भाऊ पवार यांनी विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या वेशभूषेने उपस्थितांची मने जिंकली. रावण ग्रुपचे कार्यकर्ते तसेच अंबारे गावाचे पोलीस पाटील यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
करणखेडा, अंबरे, खापरखेडा, हिंगोना, दरेगाव, बोहरा, गांधली, कलाली आदी परिसरातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या जयंती सोहळ्यात समाजातील ऐक्य, संस्कृतीचे जतन आणि युवा पिढीला भगवान एकलव्य यांच्या त्याग, निष्ठा व गुरुभक्तीचा आदर्श देण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

🙏 भगवान एकलव्य यांच्या आदर्श विचारांनी समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध