Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

नागरिकांचा रस्ता दुरस्तीसाठी ठिय् प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे



पळासनेर प्रतिनिधी :- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्याच्या वळणावर दोन्ही बाजूस चार ते पाच फूट लांब आणि दोन तीन फुट खोल मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी सोमवारी (ता.१६) रस्त्यातील खड्ड्यात फुलहार घालून प्रतीकात्मक पूजन करुन ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर नागरीकांनी आंदोलन मागे घेतले.

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर असलेल्या परिवहन विभाग व एमबीसीपीएन एल. कंपनीच्या हद्दीतील रत्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे अनेकवेळा लहान मोठे अपघात घडले आहेत. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खड्ड्यांची दुरस्ती करण्यात यावी, याबाबत संबंधीत कंपनी व परिवहन विभागाला वारंवार निवेदन दिले. मात्र, संबंधीत कंपनीच्या प्रशासनाने दखल घेतली नाही. लाखो रुपयांचा टोल आणि कर वसूल करणाऱ्या प्रशासनाला मात्र या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास वेळ मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. संतापलेल्या सामाजिक कार्यकर्ते राजेश सराफ, दिलीप कोळी, देवेंद्र यादव आदींनी रास्तारोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोडी झाल्याने सांगवी तालुका पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन नागरीकांनाची समजूत काढली. संबंधीत अधिकारी बीसीपी हेड विजय प्रभू, वाहतूक विभागाचे अधिकारी रवींद्र जाधव यांनी लवकरच रस्ता दुरस्ती करण्याचे आश्वासन दिले. वेळेत रस्त्याची दुरस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांनी दिला.

हाडाखेड (ता. शिरपूर): आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्ते व नागरिक.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध