Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
हाय सिक्युरिटी किट व सेन्सर लॉक असतानाही नवी वाहने चोरी कशी होत आहेत? चोरीमागे शोरूम–सर्व्हिस सेंटरची ‘इनसाइड लिंक’ की हायटेक चोरट्यांची खेळी?
हाय सिक्युरिटी किट व सेन्सर लॉक असतानाही नवी वाहने चोरी कशी होत आहेत? चोरीमागे शोरूम–सर्व्हिस सेंटरची ‘इनसाइड लिंक’ की हायटेक चोरट्यांची खेळी?
शहरासह ग्रामीण भागात अलीकडच्या काळात हाय सिक्युरिटी किट, सेन्सर लॉक व स्मार्ट की प्रणाली असलेली नवी कोरी वाहनेही चोरीला जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश प्रकरणांत वाहनाच्या लॉकला किंवा वायरिंगला कोणतीही तोडफोड आढळून येत नाही. त्यामुळे चोरीमागे पारंपरिक चोरट्यांपेक्षा हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत का, की शोरूम किंवा सर्व्हिस सेंटरमधील काही व्यक्तींची ‘इनसाइड लिंक’ आहे, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संशय व्यक्त होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, आधुनिक वाहनांमध्ये सेन्सर लॉक, स्मार्ट की, ECU (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट) व OBD पोर्ट असतो. या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून चोरटे काही मिनिटांत वाहन सुरू करू शकतात. OBD पोर्टद्वारे नवीन की प्रोग्राम करणे, रिमोट लॉक सिग्नल जॅमरने वाहन लॉक न होऊ देणे, किंवा आधीच मिळवलेली डुप्लिकेट की वापरणे असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे वाहन मालकाला चोरीची कल्पनाही येत नाही.या चोरी
प्रकरणांमध्ये आणखी गंभीर बाब म्हणजे अनेक वाहने चोरी होण्यापूर्वी काही दिवस आधीच शोरूम किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये गेलेली असतात. सर्व्हिस रेकॉर्ड, की प्रकार, वाहनाचे पार्किंग ठिकाण, मालकाची दिनचर्या यासारखी माहिती बाहेर गेल्यास चोरी सुलभ होते. यामुळे काही प्रकरणांत शोरूम किंवा सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
तपास यंत्रणांकडून या चोरींचा शोध घेताना CCTV फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन, वाहनातील ECU डेटा, की प्रोग्रामिंग लॉग आणि सर्व्हिस रेकॉर्ड तपासले जावेत . जर लॉक न तोडता वाहन गायब झाले असेल, एकाच मॉडेलची वाहने वारंवार चोरीला जात असतील किंवा एकाच भागात अशा घटना घडत असतील, तर इनसाइड जॉबचा संशय अधिक बळावतो, असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे.
दरम्यान, वाहनधारकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. वाहन लॉक करताना बीप किंवा इंडिकेटरची खात्री करणे, शक्य असल्यास GPS ट्रॅकर बसवणे, OBD पोर्टला लॉक लावणे, तसेच सर्व्हिसनंतर की री-कोड करून घेणे, असे उपाय तज्ज्ञांकडून सुचवले जात आहेत. केवळ कंपनीच्या सुरक्षेवर अवलंबून न राहता स्वतःची अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करणे काळाची गरज बनली आहे.
एकीकडे वाहन कंपन्या हाय सिक्युरिटीचे दावे करत असताना दुसरीकडे चोरीचे प्रमाण वाढत असल्याने “ग्राहक सुरक्षित आहेत का?” हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासातून जर चोरीमागील हायटेक पद्धती व इनसाइड लिंक उघडकीस आली, तर भविष्यात अशा प्रकारच्या वाहनचोरीवर मोठा आळा बसू शकतो. मात्र तोपर्यंत वाहनधारकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, हे मात्र नक्की.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बोराडी प्रतिनिधी : येथील ग्रामदैवताच्या दोन दिवसीय यात्रेला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असला, तरी पहिल्याच दिवशी सुरक्षेच्या च...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर बस स्थानकात हातचलाखीने चोरी करणारा अवघ्या ४ तासांत जेरबंद ५०,००० रुपये रोख रक्कम हस्तगत शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा