Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
७ वर्षांची अश्वती पाटील ठरली जिल्ह्याची ‘स्पीड क्वीन’; ३ सुवर्णपदकांसह बेस्ट अॅथलेटिक्सचा मान
७ वर्षांची अश्वती पाटील ठरली जिल्ह्याची ‘स्पीड क्वीन’; ३ सुवर्णपदकांसह बेस्ट अॅथलेटिक्सचा मान
धुळे प्रतिनिधी:- धुळे येथे नुकत्याच पार पडलेल्या सब ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये अवघ्या ७ वर्षांच्या अश्वती पाटील हिने वीजेच्या वेगाने मैदान गाजवले. विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये तिने ३ सुवर्णपदके पटकावत ‘बेस्ट अॅथलेटिक्स अवार्ड’ मिळवून जिल्ह्यातील सर्वात कमी वयाची जलद धावपटू म्हणून आपले नाव कोरले.पोदार
इंटरनॅशनल स्कूल, धुळे येथील इयत्ता पहिलीत शिकणारी अश्वती दररोज कठोर सराव करत असून, तिच्या मेहनतीचा प्रत्यय स्पर्धेच्या मैदानावर स्पष्ट दिसून आला.
अश्वतीचे वडील कृष्णा पाटील व आई छाया पाटील हे धुळे तालुका पोलीस ठाण्यात पी.एस.आय. पदावर कार्यरत असून त्यांनी मुलीच्या क्रीडा वाटचालीला सुरुवातीपासूनच भक्कम पाठबळ दिले आहे.
या दणदणीत यशामुळे अश्वतीची सब ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, कमी वयात मिळवलेले हे यश आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तिच्या या सुवर्णयशाबद्दल शाळा, क्रीडा प्रशिक्षक व जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🏅 अश्वतीची घवघवीत कामगिरी (वयोगट : ८ वर्षांखालील)
🔹 १०० मीटर धाव – सुवर्णपदक
🔹 ५० मीटर धाव – सुवर्णपदक
🔹 ब्रॉड जंप – सुवर्णपदक
🔹 ‘बेस्ट अॅथलेटिक्स अवार्ड – २०२६’ विजेती
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा