Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक अडीच लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक अडीच लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
शहादा (प्रतिनिधी) येथील पंचायत समिती कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, एका तक्रारदाराचा चौकशी अहवाल बाजूने देण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कनिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे.
अभिजित गोवर्धन भावसार (वय ४३) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यापूर्वी कार्थदे दिगर येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातील कामांबाबत भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, ज्याची चौकशी सध्या सुरू आहे. या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे पाठवताना तो तक्रारदाराच्या बाजूने सादर करण्यासाठी आरोपी अभिजित भावसार याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाचेच्या मागणीनंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहनिशा करून सोमवारी सायंकाळी शहादा येथील हॉटेल स्पाईस अँड ग्रिल परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी भावसार याने तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
तपास पथक
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास लोंढे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली असून, पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा