Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६
धुळे जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयांनी अधिकृत NIC ई-मेल वापरण्याची मागणी
साक्री प्रतिनिधी:- सामाजिक कार्यकर्ते कैलास भदाणे यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेला निवेदन धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी अधिकृत National Informatics Centre (NIC) चे ई-मेल आयडी व ई-ऑफिस प्रणालीचा सक्तीने वापर करावा, तसेच ई-मेलद्वारे प्राप्त तक्रारींचा ठराविक कालावधीत निपटारा करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास भदाणे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व जिल्हा परिषद धुळे येथे ई-मेलद्वारे तक्रार व निवेदन सादर केले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी खाजगी अथवा अनधिकृत ई-मेल आयडीचा वापर केला जात असून त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, अशी बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.
भदाणे यांनी शासनाच्या माहिती तंत्रज्ञान धोरणाचा संदर्भ देत सांगितले की, शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व उत्तरदायित्वपूर्ण करण्यासाठी सर्व कार्यालयांनी NIC चे अधिकृत ई-मेल आयडी व ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत –
जिल्ह्यातील सर्व विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व शाखा प्रमुखांनी तातडीने NIC ई-मेल आयडी कार्यान्वित करावेत.
शासकीय ई-मेलवर प्राप्त अर्ज, तक्रारी व पत्रव्यवहाराची नोंद ई-ऑफिस प्रणालीत करण्यात यावी.
प्राप्त तक्रारींचा सात दिवसांच्या आत निपटारा करणे बंधनकारक करण्यात यावे.
ई-मेलवरील अर्ज व तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
याबाबत त्यांनी प्र. सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी, नाशिक विभाग यांच्या दिनांक 22 जानेवारी 2026 च्या आदेशाचाही संदर्भ दिला आहे.
शासनाच्या डिजिटल प्रशासन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, माहिती अधिकार कायद्याची पूर्तता, अभिलेख व्यवस्थापन व नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, प्रशासन अधिक डिजिटल, पारदर्शक व जनहिताभिमुख होईल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते कैलास भदाणे यांनी व्यक्त केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे प्रतिनिधी:- धुळे येथे नुकत्याच पार पडलेल्या सब ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये अवघ्या ७ वर्षांच्या अश्वती पाटील हिने व...
-
धुळे प्रतिनिधी :- धुळे शहरातील देवपूर भागातील वाकसकर चेंबर, दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या 'श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड'च्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा