Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ मार्च, २०२६
निळवंडीत यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे शुक्रवार दि.२० मार्च रोजी हनुमान यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
निळवंडी व परिसरातील भाविकांचे हनुमान हे आराध्या दैवत आहे.वर्षभरात हनुमानाची विविध उपक्रम राबवून पुजाअर्चा केली जाते. यात्रेनिमित्त मारुती मंदिराभोवती विद्युत रोषणाई,पताका लावण्यात आल्या आहे.यात्रेमध्ये खाद्य पदार्थांची दुकाने,खेळण्यांची दुकाने, मिठाई दुकाने,पाळणे आदी दुकाने थाटणार आहे.या निमित्ताने निळवंडी येथील युवक नाशिक रामकुंडावरुन कावडीव्दारे निळवंडी येथे पायपीट करुन तिर्थ घेऊन येतात.त्यांची गावाच्या वेशीपासून वाजत - गाजत मिरवणूक काढली जाते. मारुती मुर्तीला जलभिषेक व महापूजा, नवसपुर्ती केली जाते.रात्री कलावतांचा तमाशा,देवीचे गाणे जागरण,वाघ्या मुरलीळीचे गाणे व विविध देवतांची मिरवणूक आदी कार्यक्रम होणार असून यात्रेच्या दुसर्या दिवशी हजेरी लावणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन यात्रा समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा