Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ मार्च, २०२६
विविध मागण्यांसाठी मनसेचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदन
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत,कार्यालयीन कामकाज तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिंडोरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना हप्ते वेळेवर मिळत नाही.त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार्या विकासकामांचे माहिती फलक लावले जात नाहीत.त्यामुळे नागरिकांना संबंधित कामांची माहिती मिळत नाही.जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शालेय पोषण आहार कर्मचारी अतिशय कमी मानधनावर काम करत आहेत. त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी,त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा.ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये जल जीवन मिशन योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली असली तरी काही गावांमध्ये आजही नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे आपले विभागातील पाणीपुरवठा अधिकारी हे स्तिर गतीने कामकरत असल्याचे लक्षात येत आहे.
सदर १ ते१२१ ग्रामपंचायती मधून माहिती घेऊन ज्या गावांना पिण्याचे पाण्यासाठी अडचण आहे तिथे उपयोजना लवकरात लवकर सुरळीतपणे चालू करावी. कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन परिसरात दर्शनी भागावर ओळखपत्र लावणे आवश्यक असताना अनेक कर्मचारी ते वापरत नसल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद शाळेमध्ये आजच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले,तालुकाध्यक्ष नामदेव गावित,उपतालुकाध्यक्ष सतीश मालसाने,जालिंदर राऊत,दत्तू धुळे, सोमनाथ वायकंडे आदींच्या सह्या आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा