Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ मार्च, २०२६
गोरक्षनाथ राऊत लिखित टेंडरवरची माणसं कथासंग्रहाचं २२ मार्च रोजी प्रकाशन
बापू चव्हाण दिंडोरी
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी वाडीवस्तीवरील उपेक्षित समूहाचं वास्तववादी चित्रण असलेल्या 'टेंडरवरची माणसं' या गोरक्षनाथ राऊत लिखित कथासंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध पटकथाकार संजय पवार यांच्या हस्ते २२ मार्च रोजी ए.एम. आय हॉल,शालिमार,नाशिक या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे हे असणार आहेत
तर चित्रपट पटकथाकार संजय पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
प्रगतिशील लेखक संघ, इप्टा सांस्कृतिक चळवळ नाशिक व समाज प्रबोधन प्रकाशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रगतिशील लेखक संघाचे राज्य महासचिव राकेश वानखेडे,समाज प्रबोधन प्रकाशन संस्थेचे संजय दोबाडे,जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे,मिनाज मिर्झा,कॉ. राजू देसले,देवचंद महाले,तुकाराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.साहित्य प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगतिशील संघाचे जिल्हा सचिव प्रल्हाद पवार यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा