Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
एक चुकीचा निर्णय आयुष्य बदलू शकतो; शिस्त व संयमच यशाचा मार्ग - भगवान मथुरे पोलीस निरीक्षक.
एक चुकीचा निर्णय आयुष्य बदलू शकतो; शिस्त व संयमच यशाचा मार्ग - भगवान मथुरे पोलीस निरीक्षक.
बापू चव्हाण दिंडोरी.
एक चुकीचा निर्णय आयुष्य बदलू शकतो; शिस्त व संयमच यशाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.
दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मयोगी कै. एकनाथ (भाऊ) जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे बोलत होते.
त्यानी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रभावी व वास्तववादी मार्गदर्शन केले.त्यांनी युवकांना स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, चुकीच्या मार्गाला जाल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील — “याद राखा” असा सज्जड दम त्यांनी विद्यार्थ्यांना भरला.
ते पुढे म्हणाले की,अल्पवयात चुकीच्या संगतीत जाणे,व्यसनांच्या आहारी जाणे, सोशल मीडियाचा गैरवापर करणे किंवा कायद्याचे उल्लंघन करणे यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.एक चुकीचा निर्णय संपूर्ण भविष्य बदलू शकतो, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे अत्यंत आवश्यक आहे.
मथुरे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे भान ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले.पोलिस यंत्रणा समाजाच्या सुरक्षेसाठी आहे,परंतु कोणी गुन्हेगारीकडे वळल्यास कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी युवकांना शिस्त, संयम आणि जबाबदारी या गुणांचे पालन करण्याचे आवाहन केले.
तसेच,“मोठे व्हायचे असेल तर योग्य मार्गानेच प्रयत्न करा,शॉर्टकट शोधू नका,”असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण,क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळण्याचा सल्ला दिला. आई-वडील,शिक्षक यांचा आदर राखून समाजात चांगले नागरिक बनण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरद शेजवळ यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.तसेच आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत,अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शनाची गरज अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव,प्राचार्य शरद शेजवळ,उपप्राचार्य उत्तम भरसठ,पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा भोये,पर्यवेक्षक डी.के.टोपले,आर. एस.शिंदे,टी.जी.शिंदे, कॉलेज विभाग प्रमुख विजय विंचूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.प्राचार्य शरद शेजवळ यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनीही आपल्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या प्रभावी समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक आर.एस.शिंदे यांनी मानले.
कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य शरद शेजवळ यांचा
सत्कार नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय “कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार” यंदा दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्याबद्दल त्यांचा शालेय परिवाराच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा