Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ मार्च, २०२६
कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार संघटित व असंघटित कामगार : भारतीय मजदूर संघाची घोषणा
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे 6 वे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार दि.1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.
या अधिवेशनाचे उदघाटन एस.मल्लेशम ( अखिल भारतीय अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ ) यांनी केले. या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा मा.मेधाताई कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे महावितरण चे संचालक मा.राजेंद्र पवार उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना एस.मल्लेशम यांनी सांगितले की देशातील श्रमिक व कामगार सध्या आव्हानात्मक कालखंडातून जात आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 कामगार संहितां पैकी वेज कोड व सोशल सिक्युरिटी कोड चे भारतीय मजदूर संघाने स्वागत केले असून त्यांची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच केंद्र सरकारने देशभर समान "मिनिमम फ्लोअर वेज "जाहीर करावेत. पेन्शन फंडात वाढ व ई.एस.आय.सी. योजनेची पात्रता मर्यादा 21 हजारावरून 42 हजार रुपये करावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाने करत देशभर 25 फेब्रुवारी रोजी देशभर “सरकार जागव” आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले.
मा.मेधा कुलकर्णी ( खासदार, राज्यसभा ) यांनी कंत्राटी कामगारांना कायम करावे या कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
वीज कंत्राटी कामगार संघ ही आपल्या विचारधारेची संघटना असल्यामुळे आंदोलनाची वेळ येऊ न देता प्रशासनाने तातडीने बैठका घेऊन संवाद साधत संघटनेच्या सदस्य कामगारांच्या समस्यां त्वरित सोडवल्या पाहिजे असा आग्रह वीज कंपन्याकडे धरला.
मा.राजेंद्र पवार (संचालक, महावितरण – मानव संसाधन) यांनी न्यायालयीन निकालावर अभ्यास करून कामगारांवर अन्याय होणार नाही अशी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. वीज कंपनीची प्रतिमा सुधारणे, ग्राहक सेवेशी प्रामाणिक राहण्याची व सर्वांच्या सुरक्षतेते बाबत शपथ सर्व वीज कंत्राटी कामगारांनी त्यांनी दिली.
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना विविध आर्थिक व सामाजिक लाभ संघटनेने संघर्ष करून मिळवून दिले आहेत आता कोर्टाच्या आदेशानुसार इतर कामगारांना कायम करा व राज्यात कंत्राटी कामगार पद्धत कायम स्वरूपात बंद करत कंत्राटदार-विरहित वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगारात सुरक्षेसाठी हरियाणा पॅटर्न प्रस्ताव मंत्रिमंडळास समोर तातडीने आणण्यासाठी व अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी दि.16 एप्रिल 2026 रोजी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा ( मुंबई ) येथे भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याची घोषणा भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ऍड.अनिल ढुमणे यांनी केले
या व्यतिरिक्त सी. व्ही. राजेश ( क्षेत्रीय संगठन सचिव ), किरण मिलगीर ( महामंत्री ), अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ प्रभारी के व्ही राधाकृष्णन
अध्यक्ष कंदी श्रीनिवासन ,
बाळासाहेब भुजबळ ( संघटनमंत्री ) तसेच अण्णासाहेब देसाई ( ज्येष्ठ मार्गदर्शक ) अरुण पिवळ ( सरचिटणीस ), माजी अध्यक्ष शरद संत व पालकमंत्री सुभाष सावजी उपस्थित होते.
अधिवेशनात राज्यातील सुमारे 2300 वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते.
1 ) हरियाणा पॅटर्न प्रमाणेच कंत्राटदार मुक्त रोजगार धोरण राबवावे .
2 ) सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे.
3) वीज उद्योगास स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी.
4 ) किमान वेतन नव्हे, तर जीवन वेतन द्यावे.
5 ) ई.एस.आय.सी पात्रता मर्यादा 21 हजारांवरून 42 हजार रुपये करावी असे 5 ठराव एकमताने अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
या अधिवेशनात 2006वटे 2029 साला साठी संघाचे अध्यक्ष म्हणून निलेश खरात तर सरचिटणीस म्हणून सचिन मेंगाळे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष म्हणून राहुल बोडके, संघटन मंत्री उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री अमर लोहार (कोल्हापूर) व अभिजीत माहुरकर (नागपूर) यांच्यासह चार उपाध्यक्ष व चार सचिव तसेच महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीसाठी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून बाळासाहेब भुजबळ होते.
अधिवेशनाचा समारोप सी. व्ही. राजेश यांनी केला.अधिवेशनाचे यशस्वी आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष निखील टेकवडे, सचिव योगेश महांगरे व सुमीत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दहा समित्या कार्यरत होत्या. पुण्यातील 252 कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला
कळावे
निलेश खरात
प्रदेश अध्यक्ष
9822418395
सचिन मेंगाळे
प्रदेश सरचिटणीस
9422037029
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ
(संलग्न : भारतीय मजदूर संघ)
mvkksangh@gmail.com
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा