तरी आज दिनांक 03/03/2026 रोजी सकाळी 07.30 वाजताचे सुमारास प्रभारी अधिकारी, सेंधवा ग्रामिण पोलीस ठाणे, मध्यप्रदेश यांचेकडून प्राप्त माहितीनुसार मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग, श्री सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली श्री किशोरकुमार परदेशी पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस ठाणे, श्री जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक शिरपूर तालुका पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक हेमंत खैरनार, शिरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ रविंद्र अखडमल, पोहेकॉ राजेंद्र रोकडे, पोकॉ योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोड अखडमल, भटु साळुंखे, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, मनोज महाजन तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोहेकॉ अल्ताफबेग अस्मानबेग मिर्झा, पोहेकॉ संजय आसाराम चव्हाण, पोकॉ वाला पुरोहित, मनोज नेरकर, होमगार्ड दिपक बच्छाव, होम गौतम सत्तेसा यांनी संयुक्तरीत्या केली आहे.
Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
धडाकेबाज कारवाई: सेंधवा येथील दरोड्याचा शिरपूर पोलिसांनी लावला छडा; ५ आरोपींना बेड्या, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
धडाकेबाज कारवाई: सेंधवा येथील दरोड्याचा शिरपूर पोलिसांनी लावला छडा; ५ आरोपींना बेड्या, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
शिरपूर प्रतिनिधी:- मध्यप्रदेशातील सेंधवा येथील एका अगरबत्ती कारखान्यावर सशस्त्र दरोडा टाकून पळणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरपूर तालुका आणि शहर पोलिसांनी थरारक पाठलाग करून छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून दोन आलिशान कार्ससह एकूण १९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या संयुक्त धाडसामुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली.
नेमकी घटना काय?
दिनांक ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास सेंधवा (मध्यप्रदेश) येथील 'फ्लॉवर इंडस्ट्रीज' या सुगंधी अगरबत्ती कारखान्यात ५ ते ७ अज्ञात इसमांनी अनधिकृत प्रवेश केला. दरोडेखोरांनी तेथील सुरक्षारक्षक आणि कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. कारखान्यातून अंदाजे १ लाख रुपये रोख, ३ मोबाईल फोन आणि MP13 ZR 8510 क्रमांकाची राखाडी रंगाची 'सियाझ' कार चोरून आरोपी शिरपूरच्या दिशेने पसार झाले.
पोलीस नाकाबंदी आणि थरारक पाठलाग
सेंधवा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शिरपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर परदेशी आणि शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तातडीने शिरपूर टोलनाका आणि वाघाळी टी-पॉइंट येथे कडक नाकाबंदी लावली.
नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी प्रथम चोरलेली 'सियाझ' कार अडवून त्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची 'स्विफ्ट' कार (MH 12 UC 0302) पोलिसांना पाहून भरधाव वेगाने करवंद नाका गुजराती कॉम्प्लेक्स आमोदा थाळनेर फाटा आणि कुरखळी मार्गे पळ काढू लागली. पोलिसांनी या कारचा पाठलाग सुरू केला.
ग्रामस्थांच्या मदतीने तापी काठावर कारवाई
आरोपींनी त्यांची कार सावळदे गावाजवळ तापी नदीच्या किनाऱ्यावर सोडून झाडीझुडपांतून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कुरखळीचे सरपंच श्री.मुकेश धनगर सावळदेचे सरपंच श्री. अभिजितसिंग राजपूत, मयूर राजपूत आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण परिसराला वेढा घातला. तापी नदीच्या पात्रात आणि काठावर शोधमोहीम राबवून ४ आरोपींना शिताफीने पकडण्यात आले.
अटक केलेले आरोपी (सर्व रा.पुणे जिल्हा):
१. विशाल अनिल दामोदरे (वय २६, रा. वरवाड, ता. दौंड)
२. रमेश बगू करडे (वय ५२, रा. केळगाव, ता. खेड)
३. श्याम तानाजी साळुंखे (वय २९, रा. गोपाळनगर, पुणे)
४. संतोष अण्णा शिवरकर (वय ३०, रा. बोरीपार्धी, ता. दौंड)
हस्तगत केलेला मुद्देमाल:
मारुती सुझुकी सियाझ कार: १०,००,०००/- रुपये
मारुती सुझुकी स्विफ्ट कार: ५,००,०००/- रुपये
सुगंधी तेल (३७ किलो): ३,७०,०००/- रुपये
रोख रक्कम: ३०,०००/- रुपये
५ मोबाईल फोन: ४१,०००/- रुपये
अगरबत्ती काड्या: १,०००/- रुपये
एकूण मुद्देमाल: १९,१२,०००/- रुपये
यांनी केली कारवाई:
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा