Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ मार्च, २०२६
Home
/
/
शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची ढिसाळ अवस्था; रुग्णवाहिकेतून रुग्ण आणत 'शिरपूर फर्स्ट' थेट पंचायत समिती कार्यालयात..
शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची ढिसाळ अवस्था; रुग्णवाहिकेतून रुग्ण आणत 'शिरपूर फर्स्ट' थेट पंचायत समिती कार्यालयात..
शिरपूर प्रतिनिधी :- तालुक्यातील सांगवी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गरोदर महिलेला शिरपूर येथे प्रसूती साठी दाखल करावे लागले होते. तसेच येथे रुग्णवाहिका असूनही त्यात डिझेल नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना डिझेल भरावे लागते असा प्रकार समोर आला होता. या विरोधात शिरपूर फर्स्ट या संघटनेने पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करुन गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती तसेच रुग्णवाहिकेच्या सुविधे अभावी गर्भवती महिलांना जीव धोक्यात घालून प्रसुती करावी लागत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील वाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने एका गर्भवती महिलेला रस्त्यावरच प्रसुती करावी लागली होती. त्या मातेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला होता. ही घटना ताजी असतानाच दिनांक २२ रोजी सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार घडला आहे. येथे वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एका गर्भवती महिलेला तात्काळ शिरपूर येथे हलवावे लागले होते. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे संताप व्यक्त करत “शिरपूर फर्स्ट”च्या वतीने आज शिरपूर पंचायत समिती कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेतून प्रत्यक्ष रुग्ण आणून त्याच्या हस्ते पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत , “शिरपूर तालुक्याचा आरोग्य विभाग स्वतःच रुग्णवाहिके मधील स्ट्रेचरवर आला आहे,” असा संताप व्यक्त केला. तसेच, या प्रकरणांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
यावेळी आंदोलनात भटू कोकणी, विकास कोकणी, जयेश पाटील, चेतन मोरे, रामेश्वर पावरा, चैतन्य जमादार, अनिल राजपूत, कुणाल भदाणे, हंसराज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा