Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२६

दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने व्हील चेअर व इतर साहित्य वाटप




बापू चव्हाण दिंडोरी

         समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे संकल्पनेतून व प्राथमिक शिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांचे हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी साईलता सामलेटी उपशिक्षणाधिकारी एम.डी.सूर्यवंशी, अनिल पूदाट,जिल्हा समन्वयक समाधान दाते,तालुका समन्वक प्रतिभा लोखंडे,ज्ञानेश्वर क्षीरसागर,उत्तम आंधळे,मुकेश जगताप,वनिता पाटील,कांतिलाल सोनवणे,संजय पाटील,नितीन कोकाटे,धीरज वाणी,बाप्पा गतिर, वैशाली गावित,साईराज फड,चेतन पवार,अश्विनी जाधव,रीना पवार, परमेश्वरी बुरकुल आदी उपस्थित होते.
      जिल्ह्यातील विविध शाळेत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दैनंदिन जीवनात येणारे अडथळे कमी करण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते त्यासाठी जिल्हा स्तरावर सन २०२५ -२६ या वर्षातील उपक्रम अंतर्गत शिबिर घेऊन तज्ञ डॉ. यांनी साहित्य निश्चित केले.सदर साहित्य जिल्हास्तरावर प्राप्त झाले होते. 
जिल्ह्यातील १८२ विद्यार्थ्यांना २३९ साहित्य आज रोजी वितरीत करण्यात आले.यामध्ये श्रवण यंत्र, सीपी चेअर,व्हील चेअर,रोलेटर कुबडी,स्मार्टफोन,इलेक्ट्रिक बाइसिकल,अध्ययन अध्यापन साहित्य उपलब्ध झाले आहे.
        "दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळा विरहित चलनवलन साठी उपयुक्त ठरणार आहे.

श्रीमती साईलता सामलेटी (शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध