Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२६

के.व्ही.एन.नाईक महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन.




बापू चव्हाण दिंडोरी

    के.व्ही.एन.नाईक महाविद्यालय, दिंडोरी येथील इंग्रजी विभागातर्फे द्वितीय आणि तृतीय वर्ष बी.ए. इंग्रजी विशेष स्तर च्या विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन दि.२५ मार्च रोजी करण्यात आले. इंग्रजीच्या भाषा आणि साहित्याच्या विद्यार्थ्यांना कविता,नाटक तसेच भाषा शास्त्र विषयातील विविध घटकांचे आकलन होऊन सादरीकरण करण्याची संधी मिळावी या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे यांच्या सूचनेनुसार सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
 ‌‌ उद्घाटनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.आनंद सानप,प्रा. रोहित साळवे,प्रा.निरज भाबड, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.श्रीमती रुपाली शिंदे,इतिहास विभागप्रमुख डॉ.चंद्रप्रकाश कांबळे आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम भवर हे उपस्थित होते. 
       सदर स्पर्धेमध्ये एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी इंग्रजी काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र,इंग्रजी भाषेचा इतिहास तसेच, इंग्रजी भाषा आणि उच्चार शास्त्र यातील विविध विषयांवर भित्ती पत्रके तयार करून त्याचे सादरीकरण केले.प्रा.रोहित साळवे आणि प्रा. निरज भाबड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे तसेच उप प्राचार्य डॉ.सुनील उगले यांनी विशेष मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध