Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२६
विठ्ठलराव अपसुंदे यांची कादवा स्वीकृत संचालक पदी निवड.
मडकीजांब ग्रामस्थांकडून सत्कार
बापू चव्हाण दिंडोरी :-
दिंडोरी तालुक्यातील जांबुटके गावचे प्रगतिशील शेतकरी व तालुक्याचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव प्रमोद अपसुंदे यांची कादवा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी कादवा संचालक मंडळांनी निवड केल्याबद्दल मडकीजांब ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे व सर्व संचालक मंडळ दरवर्षी सभासदांमधून स्वीकृत संचालक निवडून त्यांना कादवा संचालक मंडळाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान देऊन कामकाजाची संधी देत असतात.यावेळी विठ्ठलराव अपसुंदे यांची स्वीकृत संचालकपदी निवड केल्याबद्दल परिसरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.यावेळी मडकीजांब गावचे उपसरपंच अनिल वडजे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष साहेबराव वडजे,माजी स्वीकृत संचालक बाळासाहेब धुमणे, सोसायटीचे मा. चेअरमन आनंदराव वडजे,ज्येष्ठ नागरिक संपतराव धुमणे, प्रभाकर वडजे,सचिन वडजे,सुनील सोमवंशी,महेंद्र बोराडे,निवृत्ती बोराडे, जितेंद्र वडजे,प्रशांत वडजे,ज्ञानेश्वर वडजे,शरद गांगोडे,गणपत मोरे, राजेंद्र वडजे,तुषार वडजे,विलास वडजे,मनोहर सोमवंशी,सुभाष वडजे,शरद वडजे,विष्णु गांगोडे, यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ कादवा सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा