Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ मार्च, २०२६
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारातील शेतवस्तीवरील जबरी लुटमारीचा गुन्हा उघडकीस.
शेतवस्तीवरील जबरी लुटमार तसेच घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
माधव खाबिया :- दिंडोरी
दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दि. २३/०३/२०२६ रोजी पहाटेचे सुमारास अज्ञात चार आरोपीतांनी ढकांबे शिवारातील शेतवरतीवरील रहिवासी श्री. धात्रक यांचे राहते पराचे दरवाज्याची आतील कड़ी तोडुन आत प्रवेश करून फिर्यादी महिला व त्यांचे पती मनोहर धात्रक, तसेच मुलगा सुरेश धात्रक अशांना काहीतरी हत्याराने जिवे मारण्याचा धाक दाखवुन तसेच गंभीर जखमी करून फिर्यादीचे कानातील व गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावुन घेवुन, कपाटातील रोख रक्कम जबरीने चोरी केल्याबाबत दिंडोरी पोलीस ठाणेस गुरनं ९२/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०९ (४), ३०९ (६), ३३१ (६), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांचे पथकाने घटनास्थळी भेट देवून यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळावर मिळून आलेले भौतिक पुरावे यांचे विश्लेषण करून मिळविलेल्या माहितीच्या आधारे पिंपळवाडी, ता. राहता परिसरातून एक विधीसंघर्षितग्रस्तास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्याने त्याचे खालील साथीदारांसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.आरोपी
बाबुशा चिंगळया काळे, रा. वांगदरी, सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
, शुभम चिंगळ्या काळे, रा. वांगदरी, सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
रवि लाल्या भोसले, रा. कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
,चेंग चिंगळ्या काळे, रा. वांगदरी, सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
, कबीर उम-या काळे, रा. वांगदरी, सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
, अक्षय उम-या काळे, रा. वांगदरी, सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यालगर,सगडया उम-या काळे, रा. वांगदरी, सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
यातील आरोपी क्रं . १ ते ३ यांना अहिल्यानगर जिल्हयातील अकोले पोलीस ठाणेस दाखल असलेल्या दरोडयाचे गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. वरील आरोपी क्रं . १ बाबुशा चिंगळ्या काळे हा ओझर पोलीस ठाणेकडील दाखल जबरी चोरीचे गुन्हयात देखील फरार होता. सदर आरोपी हे जबरी लुटमार, दरोडा, घरफोडी, चोरीचे गुन्हयातील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेकडून मालाविरुध्दचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिर्खेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि हर्षल भोळे, सपोउनि नवनाथ सानप, पोहवा धनंजय शिलावटे, प्रितम लोखंडे, माधव साळे, निलेश सावकार, सुधाकर बागुल, किशोर बोडके, विश्वनाथ धारबळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने वरील प्रमाणे जबरी चोरी व घरफोडी असे पेठ पोलीस स्टेशन व दिंडोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणुन कारवाई केली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा