Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२६

शेतवस्तीवरील जबरी लुटमार तसेच घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला यश.


पेठ पोलीस स्टेशन ह‌द्दीतील चिकाडी शिवारात घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत

संदीप अवधूत :-

दि. ०२/१२/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास पेठ पोलीस ठाणे हद्‌दीत चिकाडी गावचे शिवारात फिर्यादी श्रीमती मोरे यांचे बंद घराचे खिडकीचे गज वाकवुन आत प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी शोकेस व ड्रावर मध्ये ठेवलेले पर्समधील सोन्या चांदीचे दागिणे, मोबाईल फोन व रोख रूपये असा ६६,१००/- रू. किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. सदर बाबत पेठ पोलीस ठाणेस गुरनं १९१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हादाखल होते सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपींचे गुन्हा करण्याते पध्दतीवरून
गोपनीय माहिती घेवुन आरोपी 
कमलेश लहानु चव्हाण, वय २२, रा. माळगव्हाण, ता. सुरगाणा, जि. नाशिक, व दिगंबर भागवत कडाळी, वय २५, रा. मानवडपाडा, ता. सुरगाणा, जि. नाशिक
सदर आरोपीतांना वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी माहे डिसेंबर माहिन्यात विकाडी गावात एक बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींचे कब्जातुन गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल फोन व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर आरोपीताना गुन्हयाचे पुढील तपासकामी पेठ पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध