Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ मार्च, २०२६
नव्वदीचा सुवर्णक्षण : कीर्तीकुमार कापसे यांच्या जीवनप्रवासाला मानाचा मुजरा...
कुटुंबीय, नातवंडे, पणतवंडे आणि मित्रपरिवार यांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आपुलकीची किनार लाभली. त्यांची भावंडे केशव कापसे, मारुती कापसे, माधव कापसे तसेच भगिनी शारदा लिमकर यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येत त्यांच्या साधेपणाने जगलेल्या आणि मूल्यांनी समृद्ध अशा आयुष्याचा गौरव केला.
या प्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, धाराशिव जि. प सदस्य भाऊसाहेब खरसडे, रेवन ढोरे, प्राचार्य राजकुमार पुजारी, महात्मागांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डी. डी शेरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कापसे यांच्या कार्याला सलाम केला. रुई (दुधी) गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी भावना व्यक्त करताना कीर्तीकुमार कापसे म्हणाले,
“जीवनाने मला अनेक अनुभव दिले. बदलत्या काळासोबत जगण्याची शिकवण मिळाली. सुख-दुःख, यश-अपयश या सर्वांतून एकच गोष्ट शिकायला मिळाली—प्रामाणिकपणा, कष्ट आणि माणुसकी यांची साथ कधीही सोडू नये. आज मागे वळून पाहताना समाधान वाटते की, आयुष्य साधेपणाने जगलो आणि नाती जपली.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार चंद्रकांत कापसे यांनी मानले. नव्वदीचा हा टप्पा गाठत असतानाही त्यांचा उत्साह, सकारात्मक दृष्टिकोन आणि मूल्यांवरील निष्ठा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या शतकपूर्तीकडे वाटचाल अशीच निरोगी, आनंदी आणि प्रेरणादायी राहो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा