Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ मार्च, २०२६

मडकीजांब येथे हनुमान यात्रौत्सव साजरा




माधव खाबिया दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे सालाबाद प्रमाणे हनुमान यात्रा उत्सव  दिनांक ४ मार्च रोजी संपन्न झाला असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मडकीजांब यात्रा उत्सव समितीने दिली आहे.
 सकाळी ठीक ७ वाजता हनुमान मंदिर येथे होमहवन,यज्ञ व रुद्राभिषेक संपन्न झाला .सकाळी ९ वाजता रथयात्रा संपन्न झाला . सायंकाळी यात्रा उत्सव सायं ४ वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आलेली होती यावेळी पंचक्रोशीतील नामवंत पैलवान उपस्थित होते . रात्री आठ वाजता तमाशा व वगनाट्य कार्यक्रम संपन्न झाला .
सर्व ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रा उत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे प्रभाकर (काका ) वडजे,उपसरपंच अनिल वडजे,संजय वडजे,मंगेश वडजे, मोहन वडजे,गणपत मोरे,शशिकांत गायकवाड,जितेंद्र वडजे,चेअरमन नंदकुमार मुळाणे,विजय मुळाणे, संतोष धुमणे,पप्पू निफाडे,सुनिल सोमवंशी,बाकेराव बोराडे,समीर वडजे,आनंदा धुमणे,मुकुंद वडजे, सागर वडजे,गोकुळ वडजे,शिवाजी जगताप,रविंद्र गांगोडे,रोशन वडजे, गोकुळ बोराडे,यांच्यासह ग्रामस्थांनी आदींनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध