Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२६
टेबल टेनिस मध्ये ज्ञानेश्वर क्षीरसागर जिल्ह्यात द्वितीय
बापू चव्हाण दिंडोरी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे संकल्पनेतून जिल्हा परिषद नाशिक यांचे वतीने अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टेबल टेनिस एकेरी प्रकारात ज्ञानेश्वर गंगाधर क्षीरसागर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.या यशाबद्दल क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा,खेळाचे व विविध कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळावी यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.पोलिस प्रशिक्षण केंद्र,नाशिक येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी केंद्रातील विशेष शिक्षक ज्ञानेश्वर क्षीरसागर यांना टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात संपूर्ण जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाला.
त्यांच्या या यशाबद्दल प्राथमिक शिक्षण अधिकारी साईलता सामलेटी,गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे,गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण,प्रशासन अधिकारी,नितीन दळवी,अरविंद भोर,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी,वंदना चव्हाण, कैलास पगार,चंद्रभागा तुपे,केंद्रप्रमुख नितिन बागुल,अनुसया पाटील,विजय निकम,विजय पगार,सीमा भामरे गोविंद भोये,बापू सोनवणे, मुख्याध्यापक सुनील निकम,रोहिणी परदेशी,विषय तज्ञ आरती डिंगोरे प्रांजल कोथमिरे,दीपक पाटील, पौर्णिमा दीक्षित,वैशाली तरवारे, कल्पना गवळी,तिल्लोळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे, कृष्णगाव शाळेचे मुख्याध्यापक पुष्पक शेवाळे आदीसह मुखाध्यापक,शिक्षक आदींनी अभिनंदन केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा