Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ मार्च, २०२६
दिंडोरी तालुक्यात गुणवत्ता वाढीसाठी लेट्स स्पीक इंग्लिश उपक्रम
बापू चव्हाण दिंडोरी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अवघड वाटते व पर्यायाने १० वी नंतरच्या उच्च शिक्षणात ते मागे पडतात.त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी व इंग्रजी भाषेतील त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी दिंडोरी तालुक्यातील जि.प.शाळांमध्ये दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी लेट्स स्पीक इंग्लिश हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य अधिकाधिक विकसित करून इंग्रजीचा गुणवत्ता विकास करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची घसरती पटसंख्या समस्या झाली आहे.पालकांचा जि. प. शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिकाधिक सकारात्मक व्हावा, विद्यार्थ्यांची इंगजी विषयाची भीती दूर व्हावी व जि.प.शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी दिंडोरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.सर्व
शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून शालेय परिपाठाचे वेळी इयत्तानिहाय रोज २ ते ३ वर्गातील हजेरीपटाप्रमाणे ५ ते ६ विद्यार्थ्यांकडून सर्व विद्यार्थ्यांसमोर इंग्रजी संभाषण करवून घेतात. यामुळे विद्यार्थ्यांचा इंग्रजीबाबतचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे. आपली मुले इंग्रजी बोलतात याबाबद्दल पालकांना पण अभिमान वाटत आहे.
यातून जि. प. शाळांबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागत आहे. नाशिक जिल्हा परिषदेमार्फत सध्या सुर असलेले गुढीपाडवा- प्रवेश वाढवा हे अभियान यशस्वी होण्यासाठी हा उपक्रम अतिशय परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे.दिंडोरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी गटशिक्षणाधिकारी यांनी सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
एकवीस हजार रुपये किंमतीची इंग्रजी पुस्तके गटशिक्षणाधिकारी यांचेकडून विद्यार्थ्यांना बक्षीस
लेट्स स्पीक इंग्लिश या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.यात तालुक्यातील २१२ जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात इयत्ता १ ली ते ५ वी साठी लहान गट व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी मोठा गट असे २ गट करण्यात आले.शाळा स्तर,केंद्र स्तर, बिट स्तर व तालुकास्तर अशा ४ टप्प्यांवर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील केंद्रस्तरावरील प्रथम क्रमांक, बिट स्तरावरील प्रथम क्रमांक व तालुकास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय अशा दोन्ही गटातील एकूण ६२ विद्यार्थ्यांना दिंडोरी पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली. दिंडोरी येथील पंचायत समिती सभागृहात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी सर्व यशस्वी ६२ विद्यार्थ्यांना स्वखर्चाने रु.२१ हजार रुपये किमतीची इंग्रजी संभाषणासाठी पूरक असलेली इंग्रजी पुस्तके बक्षिस म्हणून दिली.आपल्या मुलांसोबत बक्षीस स्वीकारताना मुलांबरोबरच पालकांना सुद्धा खूप अभिमानास्पद वाटले.दिंडोरी तालुक्याचा शैक्षणिक गुणवत्ता विकास अधिकाधिक होण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा