Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ मार्च, २०२६
Home
/
/
दिंडोरी–पिंपळगाव रस्त्यासाठी शेतकऱ्यांची लढाई तीव्र; मुंबईत मंत्र्यांची भेट नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश.
दिंडोरी–पिंपळगाव रस्त्यासाठी शेतकऱ्यांची लढाई तीव्र; मुंबईत मंत्र्यांची भेट नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश.
बापू चव्हाण दिंडोरी
सिंहस्थ कुंभमेळा निधीतून होत असलेल्या दिंडोरी–पिंपळगाव रस्ता रुंदीकरणासाठी भू संपादन न करता काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून, या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन विविध मंत्र्यांची भेट घेत आपली बाजू ठामपणे मांडली.
यावेळी शिष्टमंडळाने बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली या भेटीत मंत्र्यांनी शेतकऱ्यांची कैफियत शांतपणे ऐकून घेत सर्वात भूमिका दर्शवली शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून अहवाल सादर करण्याचे निर्देश किल्ल्याची माहिती देण्यात आली. तसेच कृषिमंत्री भरणे यांच्याकडूनही शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सहानुभूती दर्शवण्यात आली. आमदार नरहरी झिरवाळ यांनी पुढाकार घेत शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच महसूल विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांना न्याय मिळावा,नुकसानभरपाई देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच आमदार झिरवाळ यांनी गिरीश महाजन व चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन मिळवून दिले.आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची दिशा दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कृती समितीच्या एकजुटीमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून,पुढील काळातही सर्वांनी सक्रिय राहून ही लढाई अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा