Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ मार्च, २०२६

ग्रामपंचायत कडून नोटीसा देऊन दोन महिने पूर्ण मात्र कारवाई गुलदस्त्यात ग्रामपंचायत ची भूमिका संशयास्पद




कसबे वणी ग्रामपंचायत मालकीचे भगवती
 शॉपिंग कॉम्लेक्स ए इमारत तळमजला गाळा क्र १,२, ५, ६ हे भाडे कराराने व्यवसाय करणेकामी दिलेले आहे सदर दोन्ही गाळयामधील असलेली भिंत गाळा धारकांनी ग्रामपंचायतीची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडून गाळा क्रं १ गाळा क्रं २ गाळा क्रं ५, ६.हे दोन्ही गाळे एकत्रित केलेले आहे. सदरची बाब हि अतिशय गभीर स्वरुपाची असून ग्रामपंचायत कायदा कलम १८० व १८४ चा भंग केलेला आहे याबाबत दिनाक २६/०१/२०२६ रोजीचे ग्रामसभेवर उपस्थित ग्रामस्थांनी संबंधित गाळेधारकांनवर कार्यवाही करावी अशी मागणी करुन ठराव करणेत आलेला आहे शिवाय गाळे धारकांना नोटीसा बजावल्या त्यात नमूद असे कि तात्काळ सदरची तोडलेली भिंत होती त्या पुर्वस्थितीत बांधून घेणेत यावी अन्यथा आपण सदरचे गाळयामधील भिंत स्वतःहुन बाधून न दिल्यास गाळे धारकांविरोधात विरोधात ग्रामपंचायत कायदा कलम १८० व १८४ नुसार योग्य ती पुढील प्रशासकीय कार्यवाही करणेत येईल असे कागदी घोडे नाचवण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने केले मात्र कारवाई गुलदस्त्यात वास्तविक प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर भिंत तोडणे हा कायदेशीर गुन्हा आहे गाळे धारकांवर कायदेशीर गुन्हा दाखल होणे गरजेचे होते नोटीस देऊन दोन महिने पूर्ण झाले परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई न करता गाळे धारकांना पाठीशी घालण्याचे काम केले कि काय असा नागरिकांकडून सुर उमटतो यावर गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ठोस भूमिका घेणार का ग्रामपंचायत अधिकारी हे योग्य पद्धतीने कारवाई करतील का कारवाई न करण्याचे नेमके कारण काय कि दबाव ही चिंताजनक बाब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध