Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२६
स्मार्ट मीटर मुळे थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित.
स्वयंचलित यंत्रणेबाबत माहिती देण्याची नगर सेवक नितीन गांगुर्डे यांची मागणी
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी शहरात व तालुक्यात स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित केल्याने आज अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.वीज देयक न भरल्याने अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक ग्राहकांनी वीज कंपनी बाबत नाराजी व्यक्त केली असून स्वयंचलित स्मार्ट मीटर यंत्रणा सुरू केल्याची माहिती वीज कंपनीने देण्याची गरज होती अशी तीव्र नाराजी नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी व्यक्त केली असून ज्यांच्याकडेकडे तत्काळ वीज बिल भरण्याची सुविधा नाही त्यांनी रात्रभर अंधारात कशी काढावी असा प्रश्न नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी विचारला आहे.
वीज कंपनीने मागील वर्षी दिंडोरी शहरात व तालुक्यात गोड गोड बोलून स्मार्ट मीटर बसून घेतले. काही ठिकाणी विरोध झाला तर काही ठिकाणी ग्राहकांनी सहकार्य केले. ज्या ग्राहकांनी सहकार्य केले त्या ग्राहकांना या मीटरची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाल्याने जोरदार झटका बसला.ज्यांनी वीज कंपनी चे देयक भरले नाही त्यांचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला.घरातील वीज पुरवठा बंद झाल्याने या ग्राहकांना वीज पुरवठा का खंडित झाला याचे कारण समजत नव्हते. कारण स्मार्ट मीटर मध्ये वीज पुरवठा लाईट दिसत होता.शेवटी अनेकांनी वीज कर्मचाऱ्यांना मोबाईल वरून विचारणा केली.काही वीजतंत्रिनी तपासणीही केली.पण वीज पुरवठा का खंडित झाला याचे तत्काळ उत्तर देता आले नाही.शेवटी नाशिक येथून स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित झाल्याची माहिती मिळाली.ज्यांनी तातडीने फोन पे वर स्मार्ट मीटर क्रमांक टाकून वीज बिल भरले त्यांचा वीज पुरवठा २० मिनिटांनी सुरू झाला.पण ज्यांच्याकडे फोन पे सुविधा नाही त्यांना मात्र रात्र अंधारातच काढावी लागणार आहे. वीज कंपनीने स्मार्ट मीटर बसवले पण ते कार्यान्वित केले नाही.जर स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित झाल्याची व वीज पुरवठा अचानक खंडित केला जाणार होता हे वीज कंपनीला माहिती होते तर वीज कंपनीने ग्राहकांना माहिती का दिली नाही असा प्रश्न वीज ग्राहकांनी विचारला आहे.
शनिवार असल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान वीज कंपनीने स्मार्ट मीटर यंत्रणा सुरू झाल्याची माहिती देणे आवश्यक असून स्वयंचलित यंत्रणेबाबत तातडीने सर्व तपशीलवार माहिती अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांना द्यावी अशी मागणी नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा