Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
पिंप्रीत स्मार्ट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित; अत्याधुनिक CCTV मुळे गाव २४ तास निगराणीखाली! सपोनि हेमंत पाटील यांची भेट
पिंप्रीत स्मार्ट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित; अत्याधुनिक CCTV मुळे गाव २४ तास निगराणीखाली! सपोनि हेमंत पाटील यांची भेट
पिंप्री, ता. शिरपूर (प्रतिनिधी) : येथे पंचायत समिती सदस्य (अहिल्यापुर गण) श्री. विजय शिवदास खैरनार पिंप्री यांच्या विकास निधीतून गावात सी.सी.टि व्ही कॅमेरे बसविण्यात आले. पिंप्रीचे पोलीस पाटील श्री.जयपालसिंह गिरासे यांनी गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. तर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सुरक्षा व्यवस्था बळकट करता येते, याचा आदर्श शिरपूर तालुक्यातील पिंप्री गावाने घालून दिला आहे. गावात अत्याधुनिक CCTV कॅमेऱ्यांची उभारणी पूर्ण झाली असून, थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत या यंत्रणेची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपक्रमाचे कौतुक करत ही प्रणाली गुन्हेगारी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पाहणी करतांना गावातील सर्व प्रवेशद्वार, प्रमुख अंतर्गत व बाह्य रस्ते तसेच बसस्थानक परिसर अशा संवेदनशील ठिकाणी साऊंड रेकॉर्डिंगसह कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे गावात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक हालचालीवर २४ तास लक्ष ठेवणे शक्य होणार असून, संशयास्पद हालचालींवर तत्काळ नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. चोरीसारख्या घटनांवर आळा बसविण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार असल्याचे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले.
यावेळी पोलीस पाटील, पो.हे.काॅ. उमाकांत वाघ, माजी सरपंच श्री. प्रविण राजपुत, श्री.आर.डी.पाटील, श्री. महेंद्रसिंह सिसोदिया, श्री. संजय धनगर, माजी सरपंच श्री. किशोर पाटील, श्री.जयपालसिंह गिरासे, श्री.मनोज राजपूत, श्री.गोटू ओंकार राजपूत, श्री. योगेंद्र सत्तरसिंग राजपूत,श्री.योगेद्र पंडित गिरासे, श्री.लालसिंग धनगर, श्री. मनोज राजपूत, श्री.राकेश गिरासे, श्री.आबा धनगर, श्री. लवेंद्र पवार,श्री. प्रमोद गिरासे, कोतवाल श्री. जयेश धनगर आदी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.हेमंत पाटील यांची पहिली गाव भेट असल्याने गावकरी यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या प्रकल्पात ‘नो ब्लाइंड स्पॉट’ या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला असून, कॅमेऱ्यांचे स्थाननियोजन तांत्रिकदृष्ट्या काटेकोरपणे करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील कोणताही महत्त्वाचा भाग निगराणीबाहेर राहणार नाही. भविष्यात गुन्हे तपासात पुरावे उपलब्ध करून देण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला.दरम्यान.
या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पिंप्री गावाचा हा उपक्रम इतर ग्रामीण भागांसाठी आदर्शवत ठरत असून, स्मार्ट सुरक्षा व्यवस्थेकडे वाटचाल करणारे पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
कॅप्शन: पिंप्री येथे सी.सी.टीव्ही यंत्रनेची पाहणी करतांना थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे व आजी माजी पदाधिकारी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा