Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ एप्रिल, २०२६
धाऊर डॅम मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा पाय घसरून मृत्यू
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथील डॅम मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा पाय घसरून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे भारतीय सैनिक दलात त्याची नियुक्ती पण झाली होती अशी चर्चा गावात सुरू होती.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील धाउर येथील शेतकरी माणिक मधुकर पताडे यांचे चिरंजीव सार्थक माणिक पताडे वय वर्ष (२०) हा धाऊर येथील डॅम मध्ये मोटरपंप सोडण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गेला असता पाय घसरून पडल्याने सार्थक पताडे याचा मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे सार्थक याची भारतीय सैनिक दलात नियुक्ती झाली होती व तो लवकरच भारतीय सैनिक दलात भरती होऊन देशाची सेवा करणार होता परंतु देशाची सेवा करण्या अगोदरच देवाने त्याला मृत्यूच्या ओघात लोटले आहे. सार्थक याच्या अपघाताने परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब पवार हे करीत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा