Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ एप्रिल, २०२६
Home
/
/
अमळनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस! नियमांना पायदळी तुडवत बेकायदेशीर उत्खनन सुरू; प्रशासन झोपेत?
अमळनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस! नियमांना पायदळी तुडवत बेकायदेशीर उत्खनन सुरू; प्रशासन झोपेत?
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील वाळू उपसा योजना सध्या पूर्णपणे बेकायदेशीरतेच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने घालून दिलेल्या कडक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, वाळू माफियांचा मनमानी कारभार सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘तरुण गर्जना’ वृत्तपत्राकडून तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.
शासनाच्या नियमांनुसार वाळू घाटांवर CCTV कॅमेरे, वाहनांवर GPS प्रणाली, वाहतुकीदरम्यान जाळी (नेट) वापरणे, वजन मर्यादा पाळणे व २४x७ नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर वाळू
तस्करी तालुक्यातील अनेक घाटांवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या नजरेआड हा प्रकार सुरू असून, यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
CCTV बंद, GPS गायब – नियंत्रण यंत्रणा
कोलमडली अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे बंद अवस्थेत किंवा अस्तित्वातच नसल्याचे आढळले आहे. तसेच, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS प्रणाली नसल्याने त्यांच्या हालचालींवर कोणतेही नियंत्रण राहत नाही. परिणामी, नियमांचे उल्लंघन करून ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास, नदीपात्र धोक्यात
अनियमित व बेकायदेशीर उत्खननामुळे नदीपात्राची झपाट्याने हानी होत असून, पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कायद्यांचे उघड उल्लंघन
महाराष्ट्र लघु खनिज उत्खनन नियम, २०१३ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ यांचे उघडपणे उल्लंघन होत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
‘तरुण गर्जना’चा थेट इशारा
या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने दखल घेत दैनिक ‘तरुण गर्जना’ वृत्तपत्राने तहसीलदार, जिल्हाधिकारी जळगाव व राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
जर या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही, तर हा मुद्दा राज्यस्तरावर नेऊन मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला जाईल, असा इशाराही ‘तरुण गर्जना’ ने दिला आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा